गुहागर, ता. 26 : पाटपन्हाळे गावातील गणेश वाडी येथील अस्मी मोरे हिचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून निवड झाली. अस्मि ही अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले नावलौकिक करते. अस्मी हिने आजपर्यंत क्रीडा क्षेत्रांमध्ये अनेक पारितोषिक पटकावले आहेत. Asmi More selected for tennis ball cricket tournament

पाटपन्हाळे प्रीमियर लीग ( मुली ) मुलींची प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ही तालुक्यात नव्हे तर जिल्हात पहिल्यांदा पाटपन्हाळे येथे भरवण्यात आली आहे. टेनिस बॉल खेळणारी अस्मी ही आज राष्ट्रीय स्तरावर पोचली. तिच्या या यशासाठी तीच कुटुंब त्याचबरोबर पाटपन्हाळे प्रीमियर लीग व तिने घेतलेल्या मेहनतीला श्रेय जात. नांगरणी स्पर्धा असो वा क्रिकेट स्पर्धा यातून अस्मीने विजय प्राप्त केला आहे. तिच्यावर संपूर्ण गावातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. Asmi More selected for tennis ball cricket tournament