• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 September 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक पारदळे यांचे निधन

by Mayuresh Patnakar
September 4, 2026
in Guhagar
90 1
1
Ashok Paradale is No More
177
SHARES
505
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पेवे ग्रामपंचायतचे माजी सरपंच, विकास सोसायटीचे माजी चेअरमन अशोक गणपत पारदळे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी त्यांच्या पेवे पारदळेवाडी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवर शोकाकुल वातावरणामध्ये  पारदळेवाडी स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. Ashok Paradale is No More

यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाल, मंगेश जोशी, निसार खान सरगुरो, बाबा भालेकर, यशवंत बाईत, अभय भाटकर, खालीद खान, मंगेश सोलकर, मोहन तांबे, वैभव आदवडे, भगवान कदम, दिनकर पारधी, रामचंद्र टेरवकर, उमेश खैर, दीपक साळवी, प्रशांत जांर्भूगेकर, सचिन साळवी, रघुनाथ घाणेकर, यांच्यासह तालुक्यात विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. पेवे गावातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व अचानक हरपल्याने पेवे गावावर  शोककला पसरली आहे. त्यांच्या या अकाली निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. Ashok Paradale is No More

Tags: Ashok Paradale is No MoreGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.