कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती पुरस्काराने गौरविले
गुहागर, ता. 08 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, संगीत नाट्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना कला गौरव पुरस्कार देण्यात येतो. श्री कोपरी नारायण देवस्थानतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी वरवडे (ता. जि. रत्नागिरी) येथील नितीन जोशी यांना देण्यात आला. तसेच संगीत नाटके लिहिणारे अमेय धोपटकर यांनाही सन्मानित करण्यात आले. Artists from Varavade honored in Guhagar
श्री कोपरी नारायण मंदिरात दरवर्षी कार्तिकोत्सव साजरा केला जातो. या उत्सवातून पं. गोविंदराव पटवर्धनांच्या आठवणींचे स्मरण होण्यासाठी गेली 12 वर्ष आगळेवेगळे कार्यक्रम केले जातात. या कार्यक्रमांची सुरवात प्रसिध्द गायक मुकुंद मराठे यांच्या कल्पनेतून झाली. सुरवातीला काही कार्यक्रमांचे नियोजन गोंविदरावांना गुरू मानणारे मुकुंद मराठे यांनी केली. पं. गोविंदरावांना गुरूतुल्य मानणाऱ्या मराठी संगीत नाट्यक्षेत्रातील अनेक गायक कलाकारांना त्यांनी गुहागरमध्ये आणले. त्यानंतर मुकुंद मराठे यांच्याच मार्गदर्शनाखाली आगळीवेगळी संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा देवस्थान फंडातर्फे आयोजिक करण्यात येत असे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून पं. गोविंदराव पटवर्धनांची जन्मशताब्दी सुरू झाली. त्यानिमित्ताने संगीत नाट्यक्षेत्रात सातत्यापूर्ण, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंडाने ठरविले. पहिला कला गौरव पुरस्कार गुहागर तालुक्यातील परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबेचे घन:श्याम जोशी यांना देण्यात आला. यावर्षीचा पुरस्कार वरवडे, ता. रत्नागिरी येथील नितीन जोशी यांना देण्यात आला. Artists from Varavade honored in Guhagar

नितीन वासुदेव जोशी हे वरच्या वरवड्याचे आहेत. वडिलांकडून ते किर्तन करायला शिकले. पुढे दत्तात्रय बिवलकर यांनी त्यांच्या किर्तनकलेला साज चढविण्यासाठी मार्गदर्शन केले. नाट्यक्षेत्रातील अशोकजी समेळ सर आणि प्रदीप तेंडुलकर यांना ते आपले गुरु मानतात. रंगभुमीवरील त्यांचा प्रवास कलाकार म्हणून सुरु झाला. राज्य नाट्य स्पर्धेत उत्तम अभिनयाची तीन प्रमाणपत्र, दौन रौप्य पदके त्यांनी मिळविली आहेत. नाटकातील कामाबरोबर त्यांनी स्पर्धेसाठीची नाटके दिग्दर्शीत करायला सुरवात केली. या क्षेत्रातही आपला ठसा उमटवत त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत दोन वेळा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळवला. याच नाट्यप्रवासात ते मेकअपही करुन लागले. जयंत नाटेकर व श्रीकृष्ण शिर्के यांना ते रंगभुषा कलेतील गुरू मानतात. उत्तम रंगभुषाकार म्हणूनही त्यांनी पुरस्कार मिळविला आहे. याशिवात ते उत्तम परीक्षकही आहेत. अनेक नाटक, एकांकिकांचे परिक्षण त्यांनी केले आहे. संगीत भूषण पंडीत राम मराठे यांचा नावाचा पहिला नाट्य रत्न पुरस्कार देऊनही त्यांना गोरविण्यात आले होते. आज पंडीत गोविंदराव पटवर्धन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुहागरचे सुपुत्र व चिपळूणमधील उद्योजक श्रीराम खरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, रु. दहा हजाराचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन नितीन जोशी यांना सन्मानित करण्यात आले. Artists from Varavade honored in Guhagar

याच कार्यक्रमात वरवडे येथील अमेय जयंत धोपटकर यांनाही पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ नाट्यक्षेत्रात केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. उत्तम दिग्दर्शक असलेले अमेय धोपटकर हे संगीत नाटके लिहितात. आजपर्यंत त्यांनी संगीत कुरूमणी, संगीत लावण्यसखी, संगीत मल्लीका आणि संगीत समिधा ही नाटके लिहिली आहे. या चार नाटकांपैकी संगीत लावण्यसखी या नाट्यसंहितेला राज्य नाट्य स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे. तर संगीत मल्लीका या त्यांनी लिहिलेल्या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तर नाट्यसंहितेला प्रथम क्रमाकांने गौरविण्यात आले आहे. संगीत समिधा हे नाटक यावर्षीच्या राज्य नाट्यस्पर्धेत सादर केले जाणार आहे. कोपरी नारायण देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांच्या हस्ते त्यांना पंडीत गोविंदराव पटवर्धन स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. Artists from Varavade honored in Guhagar

या पुरस्कार वितरण सोहळ्याला कोपरी नारायण देवस्थानचे माजी अध्यक्ष अशोक दिक्षीत, उद्योजक श्रीराम खरे, देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर व सेक्रेटरी मनिष खरे उपस्थित होते. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मभुमीत, त्यांनी बांधलेल्या रंगमंचावर आणि त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री देव कोपरी नारायणाच्या मंदिरात त्यांचा नावाचा पुरस्करा मिळाल्याने आम्ही धन्य झालो आहोत. असे योगायोग खूपच कमी कलाकारांच्या नशिबात असतात. ते भाग्य आम्हाला आज लाभले. अशी प्रतिक्रिया नितीन जोशी आणि अमेय धोपटकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली. Artists from Varavade honored in Guhagar
