गुहागर, ता. 28 : विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे रविवारी गुहागर तालुक्यात आगमन झाले. पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण येथे झालेल्या कार्यक्रमात आरोग्य विभाग गुहागर मार्फत आयुष्यमान कार्ड व क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. तसेच काही निवडक लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते गोल्डन कार्ड वितरीत करण्यात आले. Arrival of the Bharat Sankalp Ratha in the taluka
विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सर्वत्र राबवत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रा.पं. मध्ये हि यात्रा काढण्यात येणार आहे. या रथामध्ये सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून एल.ई.डी. टीव्ही असलेला ट्रक प्रत्येक ग्रामपंचायतीत फिरवण्यात येणार आहे. सलग दोन महिने केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे हे धोरण आहे. Arrival of the Bharat Sankalp Ratha in the taluka
भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित, वंचित लाभार्थी पर्यंत पोहोचवावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा हि देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक एलईडी व्हॅन या प्रकारे केंद्र शासनाने नियोजन केले आहे. शासकीय योजनाची माहिती याद्वारे जनतेला देण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्टीत नागरिक, पूर्वी लाभ मिळालेले लाभार्थी त्यांच्या उपस्थितीत पाटपन्हाळे हायस्कूल मैदानात व्हॅनचे स्वागत केले गेले. Arrival of the Bharat Sankalp Ratha in the taluka


या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच नागरिकांना योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर त्याबाबत नोंदणी केली जाणार असून योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. माहितीचा प्रसार, योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद – वैयक्तिक यशकथा, अनुभव कथन, सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे असे नियोजन करण्यात आले आहे. Arrival of the Bharat Sankalp Ratha in the taluka
या कार्यक्रमाला तहसीलदार प्रतिभा वराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी घन:श्याम जांगीड, महिला बालकल्याण अधिकारी प्रमोद केळस्कर, डॉ. शशिकला वाडकर, मंडल अधिकारी राठोड, पाटपन्हाळे तलाठी शिंदे, राजू कोळवणकर, पाटपन्हाळे ग्रा.पं. सरपंच विजय तेलगडे, सागर मोरे, मनोज सकपाळ, सचिन चौगुले, गौरव वेल्हाळ, प्रफुल्ल विखारे, सर्व अंगणवाडी सेविका, आशा, पाटपन्हाळे ग्रा.वि. अधिकारी बडद व बहुमतांशी ग्रामस्थ उपस्थित होते. Arrival of the Bharat Sankalp Ratha in the taluka