धोपावेतील घटना, वन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
गुहागर, ता. 2 : तालुक्यातील धोपावे येथे खवलेमांजराची तस्करी करताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई वन विभाग रत्नागिरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. या कारवाईत चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे.
Three persons have been caught red-handed while smuggling Pangolion at Dhopave in the Guhagar taluka. The action was taken by the Forest Department, Ratnagiri and the Local Crime Branch Ratnagiri. Four wheeler were also seized in the operation.
वन विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, 2 सप्टेंबरला सायंकाळी धोपाव्यात खवलेमांजर घेवून काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभाग रत्नागिरी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी धोपावे येथे सापळा रचला होता. 2 सप्टेंबरला रात्री 8.30 वा. महेश महिपत पवार (वय 43) आगरवायंगणी ता. दापोली, संदेश शशिकांत पवार (वय 36) आगरवायंगणी ता. दापोली आणि मिलींद जाधव (वय 42) धोपावे ता. गुहागर हे तिघेजण महिंद्रा कंपनीच्या वाहनासह संशयास्पदरित्या आढळले. त्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे जिवंत खवले मांजर सापडले.
ही कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मा. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड, वनरक्षक सागर गोसावी, वनरक्षक संजय रणधिर, वनरक्षक राहुल गुंठे, तसेच पोलीस हवालदार प्रशांत बोरकर, शांताराम झोरे, बाळू पालकर, वाईड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो विजय नांदेकर यांनी केली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, चिपळूण करत आहेत.