• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरेकर प्रतिष्ठान धोपाव्याला पुरवणार ३ टँकर

by Manoj Bavdhankar
May 20, 2021
in Old News
16 0
0
आरेकर प्रतिष्ठान धोपाव्याला पुरवणार ३ टँकर
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकनेते सदानंद आरेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम

गुहागर, ता. 20 : विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहिताची कामे करणाऱ्या लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानने यावर्षी ३ दिवस धोपावे गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. सदानंद आरेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा उपक्रम प्रतिष्ठान करणार आहेत.
गेली अनेक वर्ष धोपावे गावातील 7 वाड्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी टंचाई आराखड्यातून या सात वाड्यांचा पाणीप्रश्र्न सुटावा याकरीता शासनाने धडपड केली. मात्र धोपावे गावाची पाणी टंचाई दूर करण्यात यश आलेले नाही. केवळ तीन महिन्यांच्या पाणी टंचाईसाठी एखादी मोठी योजना करणे शासनाला परवडत नाही. प्रादेशिक पाणी योजना करायची तर ती चालविण्याच्या आर्थिक क्षमतेबद्दल प्रश्र्नचिन्ह आहे. त्यामुळे धोपावेतील पाणी प्रश्र्नाकडे शासनाचे दुर्लक्षच होते. दरवर्षी या 7 वाड्यांमधील ग्रामस्थ दानशुर लोकांकडून टँकरसाठी तीन ते चार लाख रुपये एकत्र करतात. आणि एप्रिल, मे आणि जुनमध्ये पाऊस पडेपर्यंत पाणी विकत घेतात.
यावर्षी लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानने धोपावे गावाला पाण्याची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मे हा लोकनेते स्व. सदानंद आरेकर यांचा स्मृतिदिवस असतो. या निमित्ताने 23 मे, 24 मे आणि 25 मे असे तीन दिवस 12 ते 15 हजार लिटर पाणी धोपावेतील टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पुरविले जाणार आहे. अशी माहिती आरेकर प्रतिष्ठानेचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर यांनी दिली आहे.
लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या धर्तीवर गुहागर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी युवा महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गरीब ग्रामस्थांसह मजुरांना शिधा वाटपाचे काम प्रतिष्ठानने केले. स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले. गुहागर हायस्कुलमधील 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या गरीब, होतकरु 100 मुलांसाठी दत्तक पालक योजना राबविली. रामपूर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात संगणकीय प्रशिक्षण घेण्यासाठी मदत केली. प्रतिष्ठान संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीसांना राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा केला. स्व. सदानंद आरेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील आशा सेविकांना मास्क, हॅण्डग्लोव्हज्‌, फेसशिल्डचे वाटप केले. दिशा कॉम्प्युटर या संस्थेच्या मदतीने या प्रतिष्ठानने 5 विषयांचे ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग मोफत सुरु केले. युवावर्गाच्या विकास आणि समाजाच्या गरजा पूर्ण करणारे से अनेक वैविध्यपूर्णे उपक्रम हे प्रतिष्ठान राबवित आहे.

TheLoknete late Sadanand Arekar Pratishthan has decided to supply water to Dhopave village by tanker for 3 days this year. This Pratishthan regularly working for the welfare of society through various initiatives. Pratishthan will organize this project on the occasion of Sadanand Arekar’s Memorial Day.
For the last several years, 7 Wards in Dhopave village have been struggling for water. The government struggled to solve the water problem from the water scarcity plan. However, the water shortage in Dhopave village has not been resolved. Every year, the villagers in these 7 Wards collect Rs. 3 to 4 lakhs from the Doners for the Water Tanker. And buy water From April to June until rainy season start.

Tags: Breaking Newsbuy waterGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiStruggle for WaterSupplyWaterwater scarcity planWater Tankerटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.