(भाग 5)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
या लेखाचा उद्देश आपल्याला डायबेटीसची शक्यता आहे का?, आपण संभाव्य रुग्ण आहोत का? हे समजून घेणे ही आहे. समाजातल्या सर्व व्यक्ती मधुमेही नसतात. आपण मधुमेह का होता याची कारणे यापूर्वीच पाहिली आहे. तरी देखील अनेक मधुमेही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर वैद्यक शास्त्राने मधुमेह कोणाला होऊ शकतो याची ढोबळ मानाने निश्चिती केली आहे. चला तर मग संभाव्य मधुमेही कोण असू शकतात ते आपण पाहू या.
A) डायबेटीसची अनुवंशिकता :
आई वडील अथवा रक्तातील नात्याच्या व्यक्तीला डायबेटीस असल्यास.
B) लठ्ठ : कमरेचा घेर मोठा, BMR (Basal Metabolic Rate) हा २५ पेक्षा अधिक असल्यास अपेक्स हॉस्पिटलमध्ये यंत्रणाद्वारे मोफत काढतात.
C) गरोदरपणात आईला डायबेटीस झाला असल्यास; होणाऱ्या अपत्यास डायबेटीस असू शकतो.
D) P.C.O.D हा आजार असल्यास.
E) मृत बालके जन्मास घालणाऱ्या माता.
F) थायरॉईडचे रुग्ण.
G) मानसिकता- जी माणसे चिडचिडी, रागीट असतात, ताण जास्त घेतात, तणावाखाली वावरतात.
H) पुढारी व नेता- यांना सतत प्रवास, जागरण, खूप ताणतणाव.
I) IT व कॉम्पुटर क्षेत्रात काम करणारी लोक.
J) गर्भात कमी पोसलेली मुले नंतर लठ्ठ होतात.
K) गर्भ पोटात असताना माता धूम्रपान करीत असेल तर मुले स्थूल होतात.
L) भारतात जन्मलेल्या मुलाचे वजन ४ kg पेक्षा जास्त असल्यास हि मुले स्थूल होतात
M) बाटलीतील दुध पिणारी मुले देखील स्थूल होतात.
(भाग 5)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
( https://guhagarnews.com/free-camp-for-diabetic-patients-at-apex-hospital-ratnagiri/ )
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
( https://guhagarnews.com/what-is-diabetes/ )
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
( https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/ )
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
( https://guhagarnews.com/causes-of-diabetes/ )
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
(https://guhagarnews.com/types-of-diabetes/ )