• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

by Ganesh Dhanawade
August 29, 2025
in Old News
192 2
0
Appreciable performance of Guhagar Police
378
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 29 : गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत असून पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चाकरमानी यावर्षी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. बहुसंख्य चाकरमनी गावी येताना आपली वाहने घेऊन आले आहेत. शृंगारतळी ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व ग्राहक खरेदीसाठी येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. बाजारपेठ मधील रस्त्यावर वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याने जागेची अडचण असताना देखील येथील वाहतूक पोलिसांनी नम्रपणे नागरिकांशी संवाद साधत सहकार्य करण्याची विनंती करत आहेत. स्थानिक व मुंबईकर नागरिक पोलिसांच्या विनंतीला मान देत आहेत. Appreciable performance of Guhagar Police

सायंकाळी बाजारपेठेत मोठी गर्दी होत असते. त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या वाहनांची सुद्धा गर्दी होत असते. परंतु येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे सर्व वाहने सुरळीतपणे मार्गस्थ होत आहेत. गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप भोपळे, पोलीस कर्मचारी दिवस रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. Appreciable performance of Guhagar Police

याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक सचिन सावंत म्हणाले , शृंगारतळी हे वर्दळीचं ठिकाण आहे. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये मोठया संख्येने चाकरमानी येतात. अशावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्थानिक व्यापारी, ग्रामस्थ चांगले सहकार्य करत असल्याने आमचे कामं अधिक सोपे होते. यापुढील काळात सर्वांनी असेच सहकार्य करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. Appreciable performance of Guhagar Police

Tags: Appreciable performance of Guhagar PoliceGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share151SendTweet95
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.