गुहागर, ता. 17 : तालुक्यातील खोडदे येथील अनुज संदेश साळवी याने शैक्षणिक वर्ष 2026 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसई इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 96.60 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर (जि. रत्नागिरी) येथील विद्यार्थी कुमार नवोदय विद्यालयातून तो अव्वल मार्गाने उत्तीर्ण झाला असून परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. Anuj Salvi’s Success in the CBSE Exams
अनुजचे वडील संदेश गजानन साळवी हे व्यावसायिक असून गुहागर तालुक्यातील आबलोली येथे “सुयश कॉम्प्युटर” या नावाने संगणक प्रशिक्षण केंद्र चालवतात. तर आई सावी संदेश साळवी या महा ई-सेवा केंद्र चालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच आजोबा गजानन साळवी हेही प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. अनुजची बहीण अदिती साळवी हिची देखील नवोदय विद्यालयात निवड झाल्याने साळवी कुटुंबाच्या शैक्षणिक यशात आणखी भर पडली आहे. Anuj Salvi’s Success in the CBSE Exams
अनुजच्या या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. त्याच्या मेहनतीला आणि जिद्दीला यशाची साथ लाभल्याने सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Anuj Salvi’s Success in the CBSE Exams
