• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री समर्थ भंडारी सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

by Ganesh Dhanawade
June 17, 2025
in Ratnagiri
16 0
0
Annual meeting of Samarth Bhandari Credit Society
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

३०० कोटी ठेवीचे लक्ष्य; श्री प्रभाकर आरेकर

गुहागर, ता. 17  : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री. प्रभाकर आरेकर यांचे अध्यक्षतेखाली ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूणच्या कै.बाबासाहेब बेडेकर सभागृहात उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या आर्थिक वर्ष सन २०२३ / २४ मध्ये संस्थेने केलेल्या कामकाजाचा अहवाल सभासदांना सादर करण्यात आला. संस्थेने केलेल्या प्रगतीची माहिती व भविष्यातील संकल्प याबाबत बोलताना संस्थेने २०२५ / २६ या आर्थिक वर्षासाठी तीनशे कोटी ठेवीचे लक्ष्य ठेवल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर आरेकर सांगीतले. Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

सन २०२४ / २५ या आर्थिक वर्षात भाग भांडवालामध्ये ३ कोटी ३ लाख वाढ होऊन संस्थेचे भागभांडवल १२ कोटी ८४ लाख झाले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी रुपये २१९ कोटी ०४ लाख असुन एकूण कर्ज व्यवहार रुपये १७६ कोटी १८ लाख आहे. संस्थेचा एकूण निधी रुपये १८ कोटी ०६ लाख असुन एकूण गुंतवणूका रुपये ८३ कोटी ९४ लाख आहेत. संस्थेचा एकूण व्यवसाय रुपये ३९५ कोटी २२ लाख असून खेळते भांडवल रुपये २७३ कोटी ८२ लाख इतके आहे. संस्थेला सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात रुपये १६ कोटी ५० लाख एकूण नफा झाला असुन नियमानुसार सर्व तरतुदी केल्यानंतर रुपये ६ कोटी ८६ लाख निव्वळ नफा झालेला आहे. तसेच संस्थेला २०२४/२५ साठी ऑडीट वर्ग अ प्राप्त झाला असल्याची माहीती यावेळी दिली. संस्थेच्या सभासदांना १४% लाभांश जाहिर करण्यात आला. Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सभासदांनी कामकाजात सहभाग घेवून संस्थेचे सभासद श्री नंदकुमार तांबे गुरुजी, श्री. सिताराम शिंदे गुरुजी श्री. रमेश जाधव, किशोर शेटये, दत्ताराम सुर्वे, दिपक कदम व श्री विलास नामजोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करून संस्थेने अतिशय योजनाबध्द काम केले असून संस्थेची विश्वासार्हता सतत वाढत असल्याचे नमूद केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर, सहकारी संचालक मंडळ व कर्मचारी यांचे अभिनंदन व कौतुक केले. Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

Minor girl kidnapped from Ratnagiri

यावेळी संस्थेच्या सभासदांच्या १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विशेष पुरस्कार प्राप्त सभासदांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पीएचडी गाईड म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल निश्वनाथ दंडगे, ग्रामिण भागात वैदयकीय सेवा देणारे आरोग्य रत्न धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉ. राजीव विश्वनाथ दंडगे, राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२५, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, सर्व स्तरावर विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या दलवाई हायस्कुल च्या शिक्षिका सौ. रागिणी पराग आरेकर, युपीएससी परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त केलेल्या कु. सिध्दार्थ पारसमल जैन यांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला. Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात व्यवहार वाढीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे कर्मचारी श्री. राकेश अशोक गोयथळे, श्री. संदीप विष्णू राउत, सौ. दुर्वा सिध्देश सुर्वे व श्री. अजिंक्य उदय तवसाळकर या कर्मचा-यांचा आदर्श कर्मचारी २०२५ म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रभाकर आरेकर यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचे विवेचन करताना आकडेवारी सादर केली व संस्थेच्या वाटचालीमध्ये संस्थेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार व कर्जदार यांचा मोलाचा वाटा असुन त्यांचे हिताला नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे सांगीतले. तसेच संस्थेचा प्रामाणिक व सेवाभावी कर्मचारी वर्ग व संचालक मंडळ यांचे महत्वाचे योगदान असल्याचे नमूद केले. संस्थेचा कार्य विस्तार करून संस्थेला अधिक समक्ष करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन त्यासाठी यापूढेही सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांनी सर्वतोपरी मयेकर, अरुण पाटील, संचालिका सौ. स्मिता जाधव, दिपक कदम, किशोर सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सभासदांच्या गुणवंत पाल्यांचे तसेच विशेष पुरस्कार प्राप्त सभासद व आदर्श कर्मचारी यांचे अभिनंदन केले.  Annual meeting of Samarth Bhandari Credit Society   

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हेमचंद्र हळदणकर संचालक सर्वश्री. दिलीप सुहास भोसले, विजय जाधव, पराग आरेकर, दिलीप वानरकर, उदय वेल्हाळ, आरेकर, श्रीम. प्रज्ञा नरवणकर, पल्लवी भाटकर, सभासद सर्वश्री दत्ताराम सुर्वे, रमेश शिंदे, नंदकुमार तांबे, गंगाधर गोंजारे, संतोष सुर्वे तसेच अनेक सन्मा. सभासद व सभेचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री. संदिप रहाटे यांनी केले. शेटये, मनोहर शेटये, सिताराम संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. Annual meeting of Samarth Bhandari Credit Society

Tags: Annual meeting of Samarth Bhandari Credit SocietyGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.