• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 March 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ महामाई सोनसाखळी मंदिराचा वर्धापन दिन

by Guhagar News
February 19, 2026
in Guhagar
62 0
0
Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple
121
SHARES
346
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 19 : तवसाळ येथील ग्रामदैवत देवी महामाई, सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई, मंदिरातील मूर्ती नवीन मंदिराचे कलशारोहण सोहळा धुम धडाक्यात साजरा झाला. हे भव्य दिव्य मंदिर उद्धाटन ते  मंदिर नुतनीकरण प्रथम वर्धापन दिन निमित्ताने सलग तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

या महोत्सवात विविध धार्मिक विधी पार पडले.  शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी षोडशोपचारे पूजन आणि सायंकाळी देवीचे ‘रूप लावणे’ (अलंकार पूजन) करण्यात आले. रात्री स्थानिक तवसाळ ग्रामस्थ यांचे सुमधुर भजन आयोजन करण्यात आले होते. रविवार १५ फेब्रुवारी रोजी मुख्य मंदिर वर्धापन दिन सोहळा. दुपारी १ वाजता महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त उत्सवाचे रंगत वाढण्यासाठी भजनांचा जंगी ‘२० x २०’ सामना रात्री १०:३० वाजता  पाहायला मिळाला. यावेळी कोकण आणि मुंबईतील दोन दिग्गज भजनी बुवांना निमंत्रण करण्यात आले होते. बुवा सुयश मुरारी काराणे (भांडुप) बुवा श्री गणेश मनोहर जांभळे (बांद्रा) डबलबारी भजनाचा आनंद लुटण्यासाठी अनेक गावातील भजन प्रेमी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते. Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

सोमवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी दर्शनासाठी व तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला.  रात्री निमंत्रित पालशेत, वेळणेश्वर, नरवण गावचे भजन मंडळानी आपल्या सुमधुर आवाजात ग्राम दैवत श्री महामाई सोनसाखळी देवीचा महिमा गात उपस्थित प्रेक्षकांना भुरळ घातली होती. Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

कर्दे गावचे श्री महामाई सोनसाखळी देवीचे पुजारी गुरव परिवार यांनी मंदिर गाभारा ते घुमट उत्तम सजावट करत विद्युत रोषणाईने केली. या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या मान्यवर मंडळींचे  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता देवीला गाऱ्हाणे घालत देवांची रूपं उतरविण्यात आली. या मंगलमयी सोहळ्यानिमित्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मोहन यशवंत गडदे आणि समस्त तवसाळ ग्रामस्थांनी सर्व भाविक मुंबई, पुणे ठिकाणावरून भाविक दाखल झालेले होते. विशेषतः गावच्या माहेरवाशिणींनी उपस्थित राहून शोभा वाढवली. त्या सर्वांचे आभार मानले व पहिल्या वर्धापन दिनाची सांगता करण्यात आली. Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli Temple

Tags: Anniversary of Tavasal Mahamai Sonsakhli TempleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.