• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड येथील आगीत तब्बल २५ जनावरांचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
June 18, 2026
in Ratnagiri
86 0
0
Animal deaths in fire
168
SHARES
480
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज 18 जून पहाटे लागलेल्या भीषण आगीत गुरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान होऊन तब्बल २५ जनावरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे आगीत होरपळून दगावली असून दोन म्हशींना जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संबंधित पशुपालक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Animal deaths in fire

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे ५ वाजून १० मिनिटांच्या सुमारास रजवेल मोहल्ला येथील गुरांच्या गोठ्यात अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गोठ्यात मोठ्या प्रमाणात गवत आदी साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे गोठ्यात अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी वेळ मिळू शकला नाही. Animal deaths in fire

घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहायक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि प्रणव घाग यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आसपासच्या परिसरात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत गोठ्यातील १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला होता. दोन म्हशींना मात्र वेळेत बाहेर काढून वाचविण्यात यश मिळाले. मृत झालेल्या जनावरांची आर्थिक किंमत लक्षात घेता पशुपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Animal deaths in fire

आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून शॉर्टसर्किट, विजेची ठिणगी किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान, एका क्षणात अनेक जनावरे गमावल्याने पशुपालक कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट ओढवले आहे. या हृदयद्रावक घटनेबद्दल परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून नुकसानग्रस्त कुटुंबाला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. Animal deaths in fire

Tags: Animal deaths in fireGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share67SendTweet42
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.