सौ. हळदणकर ; गुहागरमधील अंगणवाडी सेविकाही होणार सहभागी
गुहागर, ता. 23 : केंद्रीय कामगार संघटनांनी 24 सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकीय सेवेत असूनही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतन, सामाजिक सुरक्षा लाभ यापासून वंचित ठेवले आहे. याला विरोध म्हणून गुहागरमधील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेशी संलग्न 342 अंगणसेविका व मदतनीस ही संपात सहभागी होणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्षा सौ. सारीका हळदणकर यांनी दिली.
The Central Worker Unions have called nationwide strike on September 24. In this Strike 342 Anganwadi workers and helpers are going to participate in the strike. Said Mrs. Sarika Haldankar, President of Anganwadi Karmachari Sabha, Guhagar Taluka Branch.
Even though we are in government service but Government not treat us as Government Servant. We do not have the same salary as government employees. Social security benefits are not available. So we are participating in the strike. said Mrs. Sarika Haldankar.
शुक्रवारी (ता. 24) देशातील इंटक, आयटक, एचएमएस, सीआयटीयु, एआयुटीयुसीयु, टीयुसीसी, एआयसीसीटीयु, आदी 9 केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती सहभागी झाली आहे. कृती समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या 7 संघटना सहभागी आहे. त्यापैकी गुहागर तालुक्यात अंगणवाडी कर्मचारी सभा ही संघटना क्रियाशील आहे. या संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ. सारीका हळदणकर यांनी सांगितले की, कोरोना संकटात आम्ही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत गावात, वाडी वस्तीत काम केले. याशिवाय देशात टाळेबंदी असतानाही अंगणवाडी अंतर्गत येणारी कामेही आम्ही करत होतो. इतके काम करुनही आम्हाला शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही. त्यांच्याप्रमाणे वेतन मिळत नाही. सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत नाही. आम्हाला दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे होते म्हणून ते आम्ही परत केले. मात्र अजुनही शासकीय कामासाठी वापरायला नवे दर्जेदार मोबाईल आम्हाला मिळत नाहीत. या धोरणांविरोधात अंगणवाडी सेविकांचा आवाज केंद्र आणि राज्य शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या संघटनेने योजना कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे 24 सप्टेंबरला अंगणवाडीचे कोणतेही कामकाज न करता एक दिवस बंद पाळण्यात येणार आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातील 243 अंगणवाड्यांपैकी सुमारे 200 अंगणवाड्यांमधील 342 सेविका आणि मदतनीस या संपात सहभागी होणार आहेत.