• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्रिकेटमधून समाजसेवेचा आदर्श

by Guhagar News
June 20, 2026
in Guhagar
114 1
0
An ideal of social service through cricket
223
SHARES
638
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

२६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर

गुहागर, ता. 20 : क्रिकेट स्पर्धेतून मिळालेल्या उत्पन्नाचा समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग करत श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडी यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. संघाच्या वतीने जीवन शिक्षण शाळा, गुहागर नं. १ येथे २६० विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  An ideal of social service through cricket

“एक वाडी, एक संघ” या संकल्पनेतून काही महिन्यांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या स्पर्धेतून प्राप्त झालेले उत्पन्न समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय संघाने घेतला होता. त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. An ideal of social service through cricket

या उपक्रमाअंतर्गत एकूण २६० विद्यार्थ्यांना वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि समाधान विशेष लक्षवेधी ठरले. An ideal of social service through cricket

यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, क्रीडा स्पर्धा केवळ मनोरंजन किंवा स्पर्धात्मकतेपुरत्या मर्यादित न राहता त्यातून समाजोपयोगी कार्य घडावे, हा संघाचा प्रयत्न आहे. शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. An ideal of social service through cricket

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ तसेच संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा विधायक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या उपक्रमासाठी चंद्रकांत झगडे, प्रशांत प्रभाकर रहाटे, स्वप्निल राऊत, ऋषिकेश रहाटे, बापू रहाटे, संतोष राऊत, राकेश राऊत, अथर्व राऊत, रोशन यादव, राजेश पवार, संजय पवार, कृष्णा रहाटे, विश्वनाथ रहाटे, अंकुर रहाटे, दीपक महाडिक, संतोष रहाटे, महेश रहाटे, विशाल पवार, योगेश वेस्वीकर, प्रदीप वेस्वीकर, शौर्य कांबळे आणि आरुष कांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच संदीप रहाटे, अरविंद रहाटे, साकेत चव्हाण, अनिकेत महाडिक, समीर महाडिक, दिनेश खेडेकर आणि स्पृहा मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. An ideal of social service through cricket

“ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला अनुसरून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून क्रिकेटच्या माध्यमातून समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारा उपक्रम म्हणून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. An ideal of social service through cricket

Tags: An ideal of social service through cricketGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share89SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.