गुहागर तालुका युवा सेना अधिकारी, शहरातील व्याडेश्र्वर देवस्थानचे खजिनदार अमरदिप परचुरे यांची रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेवर निवड झाली आहे. या संघटनेच्या नवीन कार्यकारीणीची निवड नुकतीच ऑनलाइन सभेत करण्यात आली. Amardeep Parchure (Guhagar taluka Yuva Sena Adhikari, Treasurer of Vyadeshwar Devasthan) has been selected for the Ratnagiri district chess association. The organization’s new executive was recently elected by online meeting.


रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेमध्ये आजपर्यत गुहागर तालुक्यातील कोणत्याही खेळाडुची निवड झाली नव्हती. यावर्षी प्रथमच अमरदिप परचुरे यांच्या रुपाने गुहागर तालुक्याला बुद्धिबळ संघटनेवर प्रतिनिधित्व मिळाले आहे. रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात आलेले उद्योजक श्रीराम खरे हे देखील गुहागरचे रहिवाशी आहेत. अमरदिप परचुरे यांच्या निवडीमुळे श्रीराम खरे यांना जिल्हा संघटनेचे विविध उपक्रम गुहागर तालुक्यात राबविणे सोपे होणार आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात चेस कल्चर (Chess Culture)वाढण्यास मदत होईल.
तालुक्यातील शाळांमध्ये चेस इन स्कुल (Chess in School) उपक्रम पोचवून, बुद्धिबळ खेळाबाबत जागृती निर्माण करण्याचे आणि तालुक्यातील खेळाडुंना प्रोत्साहन देण्याचे काम करणार असल्याचे अमरदिप परचुरे यांनी सांगितले आहे.