• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 April 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर महर्षी परशुराम महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

by Guhagar News
April 14, 2026
in Guhagar
56 1
0
Alumni Meet at Velneshawar College
111
SHARES
317
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. ११ एप्रिल रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित २०१२ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयातून आजवर अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आणि आता मोठमोठ्या कंपन्यांमधे उच्च पदावर कार्यरत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत. या साऱ्यांना एकत्रित करुन भेटीगाठी करणे, सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे आणि संपर्क वाढता व्हावा या उद्देशाने महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला होता. Alumni Meet at Velneshawar College

Alumni Meet at Velneshawar College

कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी माजी विद्यार्थ्यांनी उत्साहाने उपस्थिती लावली. रजिस्ट्रेशन नंतर वेलकम ड्रिंक देऊन साऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. यानंतर सर्व विभागप्रमुखांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आणि शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी आजचा कार्यक्रम निव्वळ भेटीगाठीसाठी नसून यातून काहीतरी नाविन्यपूर्ण उदयास येवो’ अशी इच्छा व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. Alumni Meet at Velneshawar College

Alumni Meet at Velneshawar College

यानंतर माजी विद्यार्थ्यांना आठवण भेट म्हणून तयार केलेल्या, महाविद्यालयाचा लोगो असलेल्या मानचिन्हांचे वितरण करण्यात आले. काही विद्यार्थी गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांची मनोगते झाल्यानंतर उपस्थित माजी विद्यार्थ्यांची मनोगते झाली. आठवणींसाठी ग्रुप फोटो काढण्यात आला. यानंतर सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. Alumni Meet at Velneshawar College

Alumni Meet at Velneshawar College

या कार्यक्रमाचे Alumni Association चे अध्यक्ष आणि मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. हृषिकेश भावे आणि प्रा. राहुल कुंडिया यांनी सुंदर नियोजन केले होते. महाविद्यालयाशी संपर्कात राहण्याचे आश्वासन देऊन माजी विद्यार्थ्यांनी निरोप घेतला. Alumni Meet at Velneshawar College

Alumni Meet at Velneshawar College

Tags: Alumni Meet at Velneshawar CollegeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.