• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 May 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करराव जाधव यांची सर्वपक्षीयांसह पत्रकार परिषद

by Guhagar News
April 21, 2026
in Politics
244 2
0
Construction Workers Monitoring Committee
479
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 21 : संसदेत मांडलेल्या आणि नामंजूर झालेल्या महिला आरक्षणासह इतर विधेयकांमागील वास्तव यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी गुरूवार, दि. २३ एप्रिल २०२६, सकाळी ११.०० वा. अतिथी हॉल, चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. All-Party Press Conference

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेमध्ये दि. १६ ते १८ एप्रिल २०२६ यादरम्यान झालेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण कायदयात दुरूस्ती करण्यासंबंधीचे १३१ वे घटनादुरूस्ती विधेयक तसेच सीमांकन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) अशी तीन विधेयके मांडण्यात आली. मात्र दोन दिवसांच्या चर्चेअंती तिन्ही विधेयके नाकारली गेली. आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत आणि महिला आरक्षणासह अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी मांडलेली विधेयके नाकारली गेली, त्यामागची वस्तुस्थिती काय? हे जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे. त्यामुळेच राष्ट्राचं ऐक्य, संविधानाने दिलेले अधिकार आणि नाकारली गेलेली विधेयके यासंदर्भात आमदार भास्करराव जाधव यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. All-Party Press Conference

देशाच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या विषयावरील पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी देशाचे एक नागरिक या नात्याने उपस्थित राहून पत्रकारांबरोबर या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. All-Party Press Conference

Tags: All-Party Press ConferenceGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share192SendTweet120
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.