दि. 26 ऑक्टोबर रोजी: 64 सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित
गुहागर, ता. 25 : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचा- यांना नियमानुसार अनुज्ञेय असलेले सेवानिवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यात यावेत’, असे शासनाचे आदेश असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व बेस्ट( BEST ) प्रशासनातील काही अधिकारी मात्र शासनाचे आदेश धुडकावून लावत आहेत. त्यामुळे या अन्यायाविरूद्ध ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) शाखा ठाणेच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. Afroh dharne movement at Azad Maidan


दि. 26 ऑक्टोबरपासून मुंबई महानगरपालिकेसमोर लोकशाही पद्धतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. 64 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना त्यांच्या न्याय हक्काच्या सेवानिवृत्तीवेतन व अनुषंगिक लाभांपासून वंचित ठेवत आहेत. या सेवानिवृत्त कर्मचा-यांना न्याय द्यावा,अशी मागणी ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्रियाताई खापरे, राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे, जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी, उपाध्यक्ष अर्जून मेस्त्री, अशोक बुरडे, सचिव घनश्याम हेडाऊ, कोषाध्यक्ष नरेंद्र भिवापूरकर यांनी केली आहे. Afroh dharne movement at Azad Maidan
शासन निर्णय दि. २१/१२/२०१९ व १४/१२/२०२२ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेतील तसेच बेस्ट (BEST) उपक्रमातील अधिसंख्य पदावरील व अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या नियमितपणे सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी – कर्मचारी यांना तातडीने सेवानिवृत्ती वेतन, ग्रॅज्यूटी व इतर सेवाविषयक लाभ मिळावेत तसेच हे लाभ देण्यास विलंब झाल्यामुळे MAT च्या आदेशानुसार निवृत्तीवेतनावर ६ टक्के व ग्रॅज्यूटीवर ८ टक्के व्याजासह रक्कम सेवानिवृत्तधारकांना अदा करण्यात यावे. या मागण्यासाठी या सेवानिवृत्त कर्मचा-यांनी ऑफ्रोहच्या बॅनरखाली आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबतची नोटीस मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त व बृहन्मुंबई विद्यूत पुरवठा आणि परिवहन उपक्रम(BEST) चे महाव्यवस्थापक यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे अवर सचिव पोलीस प्रशासनाला तसेच संबंधीतांना देण्यात आली आहे. Afroh dharne movement at Azad Maidan


याबाबत तातडीने निर्णय घेवून मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रमातील 64 सेवानिवृत्त कर्मचा-यांवरील अन्याय दूर करावा, अशा मागणीचे पत्र प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी महानगरपालिका आयुक्त व बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्यासह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास व सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. Afroh dharne movement at Azad Maidan