• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 May 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकमान्य टिळक शा.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु

by Guhagar News
May 18, 2026
in Ratnagiri
25 0
0
49
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, दि. 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रवेश प्रक्रिया 21 मे 2026 पासून सुरू करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 21 मे 2026 पासून ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश प्रक्रिया २०२६ करीता अधिक माहितीसाठी सी.आर. शिंदे, गटनिदेशक, मो. नं.९९६७७७५३१७, श्रीमती. व्ही.पी. पांचाळ, गटनिदेशक मो. नं.९०७५५८७६०६, श्रीमती. एस. यु. जाधव गटनिदेशक, मो. नं.९४२००५१२० यांना संपर्क साधावा. Admission process begins in Industrial Training Institute

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यानंतर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावेत. प्रवेश प्रक्रिया २०२६ च्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची परिपूर्ण माहिती देण्यात येईल. त्याअनुषंगाने इयत्ता दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, व्यवसाय शिक्षण पूर्ण करून त्वरीत रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश घ्यावेत. Admission process begins in Industrial Training Institute

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाचे अनुक्रमे डिझेल मेकॅनिक (प्रवेश क्षमता ४८), वेल्डर (प्रवेश क्षमता ४०), वुडवर्क टेक्निशियन (प्रवेश क्षमता २४), कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (प्रवेश क्षमता ४८), इंटिरिअर डिझाईन डेकोरेशन (प्रवेश क्षमता ४८), पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (प्रवेश क्षमता ४०), सुईंग टेक्नॉलॉजी (प्रवेश क्षमता २०), फूड प्रोडक्शन जनरल (प्रवेश क्षमता २४), डेस्कटॉप पब्लीशिंग ऑपरेटर DTPO (प्रवेश क्षमता ४८) इत्यादी व्यवसाय असुन यामध्ये सुईंग टेक्नॉलॉजी, वेल्डर, वुडवर्क टेक्निशियन या व्यवसाय अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक पात्रता इयता दहावी उत्तीर्ण/अनुउत्तीर्ण अशी आहे. व इतर एक वर्ष कालावधी व्यवसाय अभ्यासक्रमांकरीता शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे. Admission process begins in Industrial Training Institute

दोन वर्ष कालावधी अभ्यासक्रमाचे अनुक्रमे इलेक्ट्रिशियन विजतंत्री (प्रवेश क्षमता २०), मेकॅनिक मोटार व्हेईकल (प्रवेश क्षमता ४८), रेफ्रिजरेशन अॅण्ड एअरकंडिशनर टेक्निशियन (प्रवेश क्षमता २४), ड्राफ्टसमन सिव्हिल (प्रवेश क्षमता २४), ड्राफ्टसमन मेकॅनिक (प्रवेश क्षमता २०), फिटर (प्रवेश क्षमता ४०), टर्नर (प्रवेश क्षमता ४०), मशिनिस्ट (प्रवेश क्षमता ४०), मशिनिस्ट ग्राईंडर (प्रवेश क्षमता २०), वायरमन (प्रवेश क्षमता २०), आयसीटीएसएम (प्रवेश क्षमता २४), एमएमटीएम (प्रवेश क्षमता २४), इत्यादी व्यवसाय असुन यामध्ये वायरमन या व्यवसाय अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण/अनुउत्तीर्ण अशी आहे. व इतर दोन वर्ष कालावधी व्यवसाय अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण अशी आहे. Admission process begins in Industrial Training Institute

Tags: Admission process begins in Industrial Training InstituteGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.