• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्लास्टिक पिशव्यां वापर किंवा विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

by Mayuresh Patnakar
June 13, 2026
in Guhagar
16 0
0
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व प्लास्टिकमुक्त गाव या उद्देशाने महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी नियमांनुसार, तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशांनुसार ग्रामपंचायत हद्दीतील कोणताही दुकानदार, व्यावसायिक अथवा नागरिक यांनी प्लास्टिक पिशव्यांची विक्री, साठवणूक अथवा वापर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. Action against the use of plastic bags

ग्रामसभेच्या ठरावानुसार प्लास्टिक पिशव्यांचा वापर किंवा विक्री करताना आढळून आल्यास प्रथम रु. ५०० दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास रु. १,२०० दंड, तिसऱ्यांदा आढळल्यास संबंधित व्यक्ती/व्यापाऱ्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. तरी सर्व दुकानदारांनी व व्यावसायिकांनी पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करून कापडी, कागदी अथवा इतर पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करावा. तसेच आपल्या ग्राहकांनाही त्याबाबत जनजागृती करावी. सदर सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन नियमांचे पालन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. Action against the use of plastic bags

Tags: Action against the use of plastic bagsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.