• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरोपी दिलीप सूर्यवंशी यांची निर्दोष मुक्तता

by Mayuresh Patnakar
November 9, 2026
in Guhagar
25 0
0
Acquittal of accused Dilip Suryavanshi
49
SHARES
139
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण न्यायालयाने ठोठावलेली तीन वर्षे शिक्षा जिल्हा न्यायालयाकडून रद्द

गुहागर, ता. 09 : चिपळूण न्यायदंडाधिकारी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात तीन वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपी दिलीप सूर्यवंशी याची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. चिपळूण जिल्हा न्यायालयात एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी आरोपीच्या वतीने अपील दाखल केले होते. Acquittal of accused Dilip Suryavanshi

सरकार पक्षाचा आरोप असा होता की, आरोपी दिलीप सूर्यवंशी हा आरोपी शंकर पवार याचा चिपळूण कोर्टात जामीनदार राहिला होता. आरोपी शंकर पवार हा गैरहजर राहिल्याने त्याच्याविरुद्ध वॉरंट निघाले होते. त्याला पोलिसांनी पकडून न्यायालयासमोर आणले असता त्याने सांगितले की, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझ्यावर कोणतीही केस नाही. Acquittal of accused Dilip Suryavanshi

त्यावेळी जामीनदाराने आणि पोलिसांनी दिलेले फोटो पाहिले असता ते वेगळ्याच इसमाचे असल्याचे निदर्शनास आले. चौकशीअंती सदर इसम शरण इंदूरकर असल्याचे समोर आले, मात्र तो मयत झाला होता. त्यामुळे आरोपी दिलीप सूर्यवंशी याने न्यायालयात खोटा जामीन देऊन खोट्या व्यक्तीची ओळख करून दिली, हे सिद्ध झाले. या कारणावरून न्यायालयाने स्वतःहून चिपळूण पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार हेड कॉन्स्टेबल अनिल शेलार यांनी तपास करून भारतीय दंड विधान कलम २०५ नुसार गुन्हा दाखल केला होता. पुरावा घेऊन चिपळूण न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. Acquittal of accused Dilip Suryavanshi

या शिक्षेविरोधात एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी जिल्हा न्यायालय, चिपळूण येथे अपील दाखल केले. यावेळी एडवोकेट बुटाला यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना अशा प्रकारचा खटला दाखल करण्याचा अधिकार पोलिसांना नाही आणि खालच्या कोर्टाने चुकीच्या पद्धतीने शिक्षा दिली आहे, हे निदर्शनास आणून दिले. एडवोकेट बुटाला यांचा युक्तिवाद आणि कायदेशीर तरतुदी ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने आरोपी दिलीप सूर्यवंशी याला देण्यात आलेली तीन वर्षांची शिक्षा रद्द केली आणि अपील मंजूर करत आरोपीची निर्दोष मुक्तता केली. Acquittal of accused Dilip Suryavanshi

Tags: Acquittal of accused Dilip SuryavanshiGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.