गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोंबडी फाटा येथील विनयभंग प्रकरणी आरोपी विजय सकपाळ यांना गुहागर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. Accused in molestation case in police custody


विनयभंग प्रकरणी पोलिसांनी पिढीत महिलेवर झालेल्या प्रकाराबाबत योग्य ती दाखल न घेता आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गुहागर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांना जाब विचारला होता. आरोपीला सुटणारी कलमे लावून त्याला पाठीशी घातलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या ऍड. सायली दळवी यांनी केला होता. आरोपीवर अन्य कलमे देखील लावण्याची मागणी त्यांनी केली होते. त्यानूसार आरोपी विजय सकपाळ यांना अटक करण्यात आली. आणखी कलमे लावण्यासाठी त्यांची पुरवणी जबाब घेऊन त्यानुसार त्या जबाबाला लागू असलेले विविध कलमे लावण्यात आली. त्यामध्ये ७६,७५ (२), ११५(२) ही कलमे लावण्यात आली आहेत. Accused in molestation case in police custody

