गुहागर, ता. 12 : गुहागर नगरपंचायत मध्ये शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सावंत यांचे निकटवर्ती असणारे अमरदीप दीपक परसुरे याचे नाव निश्चित झाले आहे. Accepted Corporator Amardeep Parchure

अमरदीप दीपक परचुरे हे शिवसेनेच्या युवासेनाच्या तालुकाप्रमुख म्हणून 6 वर्ष काम केले. कलाविकास रंगभूमी गुहागर, गजानन नाट्य समाज ह्यांच्या माध्यमातून उत्सवांमध्ये होणाऱ्या नाटकांमध्ये अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत आदी क्षेत्रात काम केलं आहे. तसेच सध्या श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर मध्ये कार्यवाह पदावर काम करत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेचे संचालक, युवासेनेच्या जिल्हा समन्वयक पदावर कार्यरत, जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन सदस्य म्हणून 5-6 वर्ष कार्यरत, शिवसेनेच्या युवासेनेचे उपतालुकाप्रमुख, त्यानंतर 4 वर्ष तालुकाप्रमुख म्हणून काम केले. Accepted Corporator Amardeep Parchure
