‘चला लुटूया सुट्टीचा आनंद’
स्पर्धेला नाही गुणांचा गंध, मनी हवा नवकल्पनांचा छंद
प्रस्तावना
गुहागर न्यूज या वेबपोटर्लवर 1 मे पासून आपण 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटासाठी ‘चला लुटूया सुट्टीचा आनंद’ हे सदर सुरु केले. गेल्या ५ दिवसांत आपण एका मराठी कथेचे 5 भाग आणि पक्षी निरीक्षणाचे ५ भाग प्रसिध्द केले आहेत. यापुढे महिनाभर या दोन विषयांबरोबरच आणखी काही वेगळे माहितीपूर्ण विषय (घरबसल्या विज्ञान, निसर्ग माझा मित्र ) मुलांसाठी ‘चला लुटूया सुट्टीचा आनंद’ या शीर्षकाखाली प्रसिध्द करणार आहोत. या माहितीवर आधारित आम्ही मुलांसाठी एक आगळीवेगळी, हटके स्पर्धा घेवून येत आहोत.
ही स्पर्धा नेहमीसारखी गुण देणारी, गुणांचे मोजमाप करुन 1, 2, 3 क्रमांक काढणारी नाही. तर मुलांच्या नवकल्पनांना व्यासपीठ देणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मुलांच्या वेगवेगळ्या कल्पनांना, नवनिर्मितीला, निरिक्षण कौशल्याला, कलेला, लिखाणाला प्राधान्य असेल. (It is a competition that provides a platform for children’s innovation. The competition will focus on children’s different ideas, innovation, observation skills, art, writing.)
स्पर्धेची बक्षिसेही जरा हटकेच असतील. नेहमीप्रमाणे स्पर्धेतील गुणवत्तापूर्ण सादरीकरणाला प्रशस्तीपत्रक, आकर्षक बक्षिस असेलच. त्याशिवाय स्पर्धेदरम्यान मुलांची कलाकृती गुहागर न्यूजच्या माध्यमातून प्रसिध्दही केली जाईल.
ही स्पर्धा आजपासून सुरु झाली आहे. Today The Competition is Start.
स्पर्धा वयोगट
दोन प्रकारच्या स्पर्धा आपण घेत आहोत. या स्पर्धांसाठी आपण चार गट केले आहेत. ते वयोगटावर आधारीत आहेत. मुले मुली असा स्वतंत्र गट स्पर्धेत नाही.
वयोगट 1 : 5 वर्ष पूर्ण ते 11 वर्ष पूर्ण
वयोगट 2 : 11 वर्ष पूर्ण ते 17 वर्ष पूर्ण
असेच दोन वयोगट दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र असतील.
स्पर्धेतील सहभागाविषयी
या स्पर्धेत 5 वर्ष पूर्ण ते 17 वर्ष पूर्ण या वयोगटातील सर्व मुले सहभागी होऊ शकतात.
(गुहागर न्यूजचे वाचक केवळ गुहागरपुरते मर्यादित नाहीत. आज गुहागर न्यूज पहाणारे भारतामधील अनेक शहरातंनू तसे विदेशातही आहेत. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कुठे रहाता याचे बंधन नाही.)
स्पर्धेसाठी कोणतीही नाव नोंदणी नाही. स्पर्धेत कधी सहभागी व्हायचे याला वेळेची मर्यादा नाही. (प्रतिक्रिया स्पर्धेला फक्त तीन दिवसांचे बंधन आहे.) किती वेळा सहभागी व्हायचे यालाही मर्यादा नाही. एखादा स्पर्धक केवळ एकाच वेळी स्पर्धेत सहभागी झाला तरी त्याला बाद केले जाणार नाही. किंवा एखाद्या स्पर्धकाने दोन्ही स्पर्धेतील प्रत्येक माहितीवर आधारित काही ना काही काम केले म्हणून त्याला जास्त गुण मिळतील असेही नाही. कारण ही स्पर्धा गुणांवर आधारित नाही.
स्पर्धा क्रमांक 1 : Comment Competition (प्रतिक्रिया स्पर्धा)
‘चला लुटूया सुट्टीचा आनंद’ या शीर्षकाखाली प्रसिध्द होणाऱ्या कथा/माहिती/प्रयोग/व्हिडिओच्या खाली एक कॉमेंट बॉक्स असतो. या कॉमेंट बॉक्समध्ये मुलांना या कथेबाबत, माहितीबाबत, प्रयोगाबाबत काय वाटतं ते लिहायचे आहे. यातील कॉमेंट ही संबंधित मजकुराशी निगडीत असावी.
1 ते 5 मे या कालावधीत दिलेल्या माहितीवरील प्रतिक्रिया स्पर्धेत सहभागी होण्याची मुदत 8 मे 2021 रात्री 12.00 वाजता संपेल याची नोंद घ्यावी.
उदाहरणार्थ :
तिसऱ्या कथेत मुले जी कृती करतात. त्याचा संबंध काही आसनांशी आहे. त्यांची नावे असे काहीही.
पक्षी निरिक्षणातील पक्षाची अधिक माहिती, त्यापक्षाच्या संदर्भाने मुलांना माहिती असलेली छोटीशी गोष्ट.
एखादा विज्ञानाचा प्रयोग असेल वेगळ्या पध्दतीने केला असेल तर त्याची माहिती. किंवा त्या प्रयोगामागचे शास्त्रीय तत्त्व.
फक्त ही गोष्ट मला आवडली, ती खुपच सुंदर होती. गोष्ट वाचताना, पक्षी पहाताना मजा आली. असा मजकुर नसावा.
स्पर्धेच्या अटी
प्रतिक्रिया किमान 16 शब्दांची असावी. कमाल शब्दमर्यादा 500 शब्द.
प्रतिक्रिया संबंधित माहितीच्या कॉमेंट बॉक्समध्येच लिहिलेली असली पाहिजे. अन्य मार्गाने (व्हॉटसॲप, फेसबुक, इमेल) आलेली प्रतिक्रिया गृहित धरली जाणार नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, एवढ्याच भाषेत प्रतिक्रिया असावी.
प्रतिक्रिया मुलांनीच लिहिलेली असावी. पालकांनी लिहिलेली प्रतिक्रिया चालणार नाही. अशी शंका आल्यास खातरजमा करुन घेतली जाईल.
कॉमेंट लिहून झाल्यावर विद्यार्थ्यांने आपले संपूर्ण नाव, वय, मोबाईल क्रमांक लिहिवा.
प्रसिध्द केलेल्या मजकुराच्या दिनांकापासून पुढील तीन दिवस पाठवण्यात येणाऱ्या प्रतिक्रिया या स्पर्धेसाठी गृहित धरल्या जातील.
सातत्याने, वेगवेगळ्या भागांवर सर्वाधिक अर्थपूर्ण प्रतिक्रीया देणारे सर्व स्पर्धक बक्षिसाचे मानकरी असतील.
पालकांना सूचना
ही स्पर्धा मुलांना संवाद कला यावी, भाषेवर प्रभुत्व यावे, शब्दसंग्रह वाढण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून पालकांनी प्रामाणिकपणे मुलांना त्यांच्या भाषेत लिहू द्यावे. एखाद्याला टायपिंग जमत नसेल तर त्यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी पालकांनी टाईप केली तरी चालेल. तांत्रिक साह्य पालकांनी केले तरी चालेल.
स्पर्धा क्रमांक 2 : Innovation Competition
या स्पर्धेचं स्वरुप थोडं कठीण आहे. त्यामुळे आपण विषयश: ही स्पर्धा कशी असेल ते समजून घेवूया.
तुम्ही रोज एक कथा वाचताय ना. आजच एका सातवीतील मुलीने पहिली कथा सादर केल्याची व्हॉइस क्लिप (रेकॉर्डींग) पाठवली. कोणी या कथेचे नाटुकल्यात रुपांतर करेल. कोणी या कथेसारखी दुसरी कथा लिहेल. एक दोन मित्र एकत्र येवून नाट्यवाचनासारखे ही कथा वाचतील. कोणी कथेवरुन चित्रही काढेल. अशा खुप साऱ्या गोष्टी तुम्ही करु शकता.
पक्षी निरीक्षणाचेही तसंच आहे. कदाचित आज पाठवलेला एखादा पक्षी तुम्हाला तुमच्या दारात दिसेल. तुम्ही त्याचा फोटो काढाल. एखादा वेगळी माहिती संकलीत करेल. वेगळ्या पक्षाची माहिती आणि फोटो देईल. कोणी स्वत: पक्षासारखा आवाज काढेल. कोणी चित्र काढेल. अशा अनेक नव्या गोष्टी तुम्हाला सुचतील. त्या तुम्ही कराव्यात.
घरबसल्या विज्ञान मधुन आम्ही तुम्हाला घरात करायचे फक्त 10 प्रयोगांच्या कृती पाठवणार आहोत. हे प्रयोग तुम्ही घरात करताना त्यापाठचे विज्ञान शोधुन काढा. घरामध्ये तुम्हाला विज्ञानाचा नवा प्रयोग करता येईल. तो प्रयोग आम्हाला पाठवा.
निसर्ग माझा मित्र हे सदर अजुन सुरु झालेले नाही. मात्र या सदरामध्ये आम्ही काही व्हिडिओ/माहिती देणार आहोत. अगदी तसंच तुम्ही निसर्गात जा, शोधा तुम्हालाही अनंत गोष्टी दिसतील. त्या अनुभवा. त्या आम्हाला विविध पध्दतीने शेअर करा.
आता लक्षात आलं ना. मुलांच्या कल्पनांना कोणतीही मर्यादा नाही. जे सुचेल ते त्यांना करु द्या. ते आम्हाला पाठवत रहात. या सगळ्या गोष्टी देखील ऑनलाइनच (ई मेलद्वारे) पाठवायच्या आहेत.
स्पर्धेच्या अटी
प्रत्येकाने आपले साहित्य इमेलवर पाठवताना संपूर्ण नाव, वय, पत्ता, आई/वडिलांचा मोबाईल क्रमांक, इमेल आयडी लिहिणे सर्वांना बंधनकारक आहे.
आवाजाचे रेकाँडिंग/ फोटो/व्हिडिओ मुलांची निर्मिती असली पाहिजे. अन्य संकेतस्थळांवरुन, दुसऱ्याकडून घेतलेले साहित्य आढळल्यास ते स्पर्धेतून बाद होईल. त्याची कारणमिमांसा केली जाणार नाही.
या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला वेळेचे बंधन नाही. 1 मे रोजी प्रसिध्द झालेल्या मजुकरावर स्पर्धक 30 मे पर्यंतच्या कालावधीत माहिती पाठवू शकतो.
पालकांसाठी सूचना
ही गुणात्मक स्पर्धा नसून या स्पर्धेचा हेतू मुलांची निरिक्षणक्षमता, आकलनशक्ती वाढावी. नवनिर्मितीचा छंद लागावा हा आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये पालकांनी तांत्रिक साह्य केले तरी चालेल. अन्य कोणतीही मदत पाल्याला करु नये. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्यावा. कदाचित स्पर्धेत पाल्य झळकावा म्हणून काहीजण नियम मोडून वागण्याचा प्रयत्न करतीलही. पण त्या क्षणभंगुर आनंदात पाल्याच्या क्षमतावृध्दीचे नुकसान होईल.
वरील माहिती वाचल्यानंतरही आपल्याला काही प्रश्र्न असतील तर खालील क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे संपर्क साधुन प्रश्र्न विचारावा. (कोणीही फोन करु नये.) आपण शंका विचारल्यानंतर 24 तासांच्या आत आपल्या प्रश्र्नाचे उत्तर दिले जाईल.
मयुरेश पाटणकर (9423048230), मनोज बावधनकर (9011535300), गणेश धनावडे (9421187522)
स्पर्धेतील माहिती, व्हिडिओ, फोटो, चित्र आदी साहित्य पाठविण्यासाठी आमचा ई मेल आयडी :-
guhagarnews2020@gmail.com