गुहागर, न्यूज : भारतीय संस्कृतीत निसर्गातील प्रत्येक घटक पूजनीय मानला जातो. या घटकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. दिवाळीतील दुसरा दिवस ‘वसुबारस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुख्यतः गोवत्स धेनु म्हणजेच गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. वसुबारस हा सण फक्त गायीच्या पूजेपुरता मर्यादित नाही. स्त्रीच्या अंगभूत मातृत्वगुणांचा सन्मान करण्याचा दिवस आहे.
वसुबारसच्या संदर्भात अनेकांना असा प्रश्न पडतो की, “गाय का? इतर प्राणी का नाही?” आधुनिक काळात या प्रश्नाला बोधदायक उत्तरे दिली जाऊ शकतात. गाय फक्त अन्नदाता नसून पालनकर्त्या, करुणामयी आणि जीवनाला स्थैर्य देणाऱ्या मातृत्वशक्तीचे मूर्त प्रतिक आहे. तिच्या माध्यमातून शरीराला पोषण मिळते. तिच्या निस्वार्थ दानातून माणसाला जीवनाचे मूल्य शिकायला मिळते. A journey of motherhood’s power
भारतीय संस्कृतीत “मातृत्व” ही केवळ स्त्रीची जैविक भूमिका नाही. ती सृष्टीचा मूलाधार आणि प्रेमाचे सर्वोच्च स्वरूप आहे. जगातील प्रत्येक सजीव, नातं, संस्कार या मातृत्वाच्या ऊर्जेशी निगडित आहे. “आई” ही मानवी जीवनातील महत्त्वाची व्यक्ती आहे. ती जीवनाला आकार, दिशा देणारी आणि रक्षण करणारी शक्ती आहे. याच मातृत्वाचं राष्ट्राच्या दृष्टीने सर्वव्यापी रूप म्हणजे “भारत माता”. ही भूमी आपल्याला अन्न, पाणी आणि जीवन देते. तिच्या कणाकणात श्रम, संस्कृती आणि इतिहासाचं वैभव दडलेलं आहे. गोमातेचं दूध, जननीची करुणा आणि भारतमातेची संपन्नता या तिन्ही रूपांत मातृत्वाचा एकच संदेश आहे तो म्हणजे पालन, संरक्षण आणि समता.
वसुबारस या सणातून माणसाने लक्षात घ्यायला हवे की पालन करणं, संवेदना राखणं आणि भूमीचा आदर करणं हेच खऱ्या अर्थानं मातृत्वाचं पूजन आहे. जो समाज आपल्या गाईंचा ,मातांचा आणि भूमीचा सन्मान करतो तो समाज नैतिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध राहतो. त्यामुळे वसुबारस हा सण मातृत्वाच्या शक्तीचं स्मरण आणि त्यातून निसर्ग, नातं आणि राष्ट्र यांच्यातील नात्याची जाणीव आहे. A journey of motherhood’s power
गोमाता :
भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ एक पशू नाही. तिचं अस्तित्व मानवाच्या दैनंदिन जगण्यात, कृषी संस्कृतीत आणि आध्यात्मिक आचरणात खोलवर रुजलेलं आहे. गाय आपल्या दुधाद्वारे शरीराचं पोषण करते. तिच्या शांत, संयमी आणि स्थिर स्वभावातून ती मनालाही शांती प्रदान करते. म्हणूनच ऋग्वेदात गाईला
धेनुर्न वत्सं पयसाभि वज्रिणमिन्द्रमिन्दवो मधुमन्त ऊर्मय: ॥ ९.८६.२
(गाय दूधाने पोषण करणारी जीवनदायिनी आहे)
असे म्हटले आहे. याशिवाय
बृहन्नच्छायो अपलाशो अर्वा तस्थौ माता विषितो अत्ति गर्भ: । अन्यस्या वत्सं रिहती मिमाय कया भुवा नि दधे धेनुरूध: ॥ बृहन् । अच्छायः । अपलाशः । अर्वा । तस्थौ । माता । विऽसितः । अत्ति । गर्भः । अन्यस्याः । वत्सम् । रिहती । मिमाय । कया । भुवा । नि । दधे । धेनुः । ऊधः ॥ १०.२७.१४ (धेनू एक जीवनदायिनी माता आहे, जी संततीसाठी पोषण करते, प्रेमाने बछड्यास मार्गदर्शन करते, सुरक्षितता आणि शक्ती प्रदान करते, आणि तेजस्वी उर्ध्व प्रवाहासारखी जीवनसत्त्वे वितरीत करते.) अशा विविध ऋचा , श्लोक व विविध संतांचे अभंग गाईचा महिमा सांगणारे साहित्यात दिसून येतात. A journey of motherhood’s power
गोमातेच्या पालनशक्तीत “मातृत्व” हेच मूळ आहे. ती देताना काही मागत नाही. तिचं अस्तित्व निसर्गाशी सुसंवादी आहे. ती शांततेने, स्थैर्याने आणि सातत्याने माणसाच्या जीवनचक्राला आधार देते. तिच्या दुधात शरीराला पोषण देणारे सत्त्व असतं. गोमाता ही केवळ धर्माशी निगडित नाही ती भारतीय जीवनपद्धतीतील संस्कार आणि करुणेचे मूर्त रूप आहे. जी शिकवते की खरी संपत्ती देण्यात आहे आणि खरं सामर्थ्य शांततेत आहे.
माता : संस्कारांची मूळ शक्ती
भारतीय संस्कृतीत माता म्हणजे आई. ही केवळ जीवन देणारी स्त्री नाही. ती संस्कारांची, मूल्यांची आणि नैतिकतेची मूळ शक्ती आहे. आईच्या ममतेतूनच मुलांना जीवनाचा अर्थ समजतो. तिच्या मार्गदर्शनातून त्यांना संयम, सहिष्णुता, कर्तव्य आणि नैतिकता यांचे मूल्य आत्मसात होते. आईची भूमिका केवळ शारीरिक पोषणापुरती मर्यादित नाही. ती मानसिक आणि भावनिक पोषण देणारीही आहे. तिच्या प्रेमामुळे मुलांचे मनोबल मजबूत होते. तिच्या संस्कारामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सुदृढ घडते. A journey of motherhood’s power
भारत माता : आत्म्याला पोषण देणारी
भारतीय संस्कृतीत भारतमातेचं स्थान केवळ भौगोलिक भूमीपुरतं मर्यादित नाही. ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि आत्म्याची जननी आहे. गोमाता जिथे शरीराला पोषण देते, जननी जिथे मनाला पोषण देते, तिथे भारत माता आपल्या सर्वसमावेशक मातृत्वशक्तीने राष्ट्राच्या आत्म्याला पोषण देते. तिच्या नद्यांमध्ये जीवनाचा स्रोत आहे, शेतांत अन्न आहे. जंगलांत निसर्गाचे स्थैर्य, प्राणिमात्रांचे सामर्थ्य आहे. तिच्या संस्कृतीच्या वारशातून माणसाला आत्मसन्मान, सामाजिक जबाबदारी आणि मूल्यांची जाणीव मिळते.
भारतमाता माणसाला भौतिक संपन्नतेसह संस्कारांची श्रीमंती आणि आत्मिक स्थैर्य प्रदान करते. तिच्या उपस्थितीतच समाजाचे ऐक्य टिकते, संस्कार दृढ राहतात. लोकांमध्ये कर्तव्याची भावना निर्माण होते. प्रत्येक शेत, नदी, पर्वत आणि वन या मातृत्वाच्या तिन्ही रूपांच्या पोषणाचे प्रतीक आहेत. अशा प्रकारे, गोमाता–माता–भारत माता या त्रिसूत्री मातृत्वातून एक अखंड प्रवाह दिसतो. A journey of motherhood’s power
