रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा
गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ नूकताच शाळेत पार पडला. Success of Guhagar High School

प्राथमिक गट गुहागर तालुक्यात प्रथम आर्या मंदार गोयथळे, तृतीय समर्था मंदार. माध्यमिक गट प्रथम कनिष्का समीर बावधनकर, द्वितीय आर्या समीर पावस्कर या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळास्तर प्राथमिक गट तृतीय अनघा अभय साटले, माध्यमिक गट शाळास्तर तृतीय मुग्धा सुभाष गमरे यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण समारंभ शाळेत पार पडले. Success of Guhagar High School

या बक्षीस वितरण कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, निलेश गोयथळे, राधा शिंदे अविनाश गमरे दिलीप मोहिते ज्योती देवकर, दिपाली पाकळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गमरे यांनी केले. Success of Guhagar High School
