• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

टाटाची नवी इलेक्ट्रीक कार

by Mayuresh Patnakar
April 5, 2022
in Travel
16 1
0
Tata's New Electric Car

Tata's New Electric Car

32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एका चार्जिंगमध्ये धावणार 590 कि.मी.

गुहागर, ता. 05 : टाटा मोटर्स पुन्हा एकदा सिएरा इलेक्ट्रीक कार सारखी दिसणारी नवी कार बाजारात आणणार आहे. ऑटो एक्स्पो 2020 (Auto Expo2020)  मध्ये  जुन्या टाटा सिएरा (TATA Sierra) SUV चे नवे  इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट (Electric Concept) मॉडेल प्रदर्शित करुन टाटाने सर्वांनाच चकीत केले. गेल्या दोन वर्षात या कारवर काम सुरु असताना कंपनीने या संदर्भातील कोणतीही माहिती माध्यमांवर येणार नाही याची काळजी घेतली होती.  Tata’s New Electric Car

इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये ‘टाटा’ चांगली कामगिरी करत आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) च्या ‘नेक्सन ईव्ही’ (Nexon EV) व टिगोर ईव्ही (Tigor EV) या दोन गाड्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. Tata’s New Electric Car

Tata's New Electric Car
Tata’s New Electric Car

Tata’s new electric car 


ऑटो एक्स्पो 2020 मध्ये बदल ओळखा या टॅगलाईन सह एक टीजर प्रकाशित केला. त्यामधुन टाटाची नवी इलेक्ट्रीक कार 6 एप्रिल 2022 ला बाजारत येत सर्वांना कळले. या टीजरमधील गाडी टाटाच्या जुन्या सिएरा प्रमाणे दिसते. त्यामध्ये अनेक छोटे छोटे बदल करण्यात आले आहेत. एकावेळी केलेल्या चार्जिंगमध्ये ही कार 590 कि.मि. धावेल असे सांगण्यात आले आहे. (Tata’s new electric car)

Tata's New Electric Car
Tata’s New Electric Car

टाटाने 90 च्या दशकात सिएरा, सफारी या लांब गाड्या बाजारात आणल्या होत्या. या दोन्ही गाड्यांची जाहीराती लोकप्रिय झाल्या. परंतु अपेक्षाप्रमाणे गाड्याची विक्री झाली नाही. त्यामुळे या दोन्ही मॉडेलचे उत्पादन थांबवावे लागले होते. Tata’s New Electric Car

पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने जनता वैतागली आहे. वाहन चालक, मालकांचा ओढा आता सीएनजी (CNG)  किंवा इलेक्ट्रिक (Electric Car)  गाड्या खरेदीकडे आहे.  ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन वाहन कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यास सुरवात केलीय. या पार्श्र्वभुमीवर आता नव्या रुपात येणाऱ्या सिएरा सदृष्य इलेक्ट्रीक SUV कारचे स्वागत देश कसे करतो हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Tata’s new electric car)

Tags: electric carGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTata's New Electric Carइलेक्ट्रीक कारटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.