• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश

by Ganesh Dhanawade
April 1, 2022
in Maharashtra
17 0
0
आ. भास्करराव जाधव यांच्या प्रयत्नांना ऐतिहासिक यश
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर होणार

गुहागर, ता. 01 : कोकणातील मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्यात यासाठी सतत विधानसभेत आवाज उठवून तसेच संबंधित विविध मंत्री यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करणाऱ्या आ. श्री. भास्करराव जाधव (MLA Bhaskarrao Jadhav) यांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आले आहे. राज्याचे महसूलमंत्री ना. श्री. बाळासाहेब थोरात (Revenue Minister no. Mr. Balasaheb Thorat) यांनी त्यांना पत्र पाठवून याच महिन्याच्या म्हणजेच एप्रिल २०२२ अखेरपर्यंत ड्रोन सर्व्हेद्वारे भूमापन पूर्ण होऊन मच्छिमार समाजाला ते रहात असलेल्या जागांची मिळकत पत्र दिली जातील, असे स्पष्ट केले आहे. Success to MLA Jadhav’s Efforts

या ऐतिहासिक निर्णयामुळे मच्छिमार समाजाचा अनेक वर्षांपासूनचा खूप मोठा प्रश्न मार्गी लागला असून आता त्यांची हक्काची स्थावर मालमत्ता असेल. हा निर्णय करण्यास सरकारला भाग पाडल्याबाबत अनेक मच्छिमार बांधव तसेच मच्छिमार संस्थांनी आमदार श्री. जाधव (MLA Bhaskarrao Jadhav) यांचे आभार मानले आहेत. Success to MLA Jadhav’s Efforts

पिढ्यानपिढ्या एका ठिकाणी रहात असूनही स्वत:च्या घराखालची जमीन नावावर नसल्याने या समाजाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु आता या ऐतिहासिक निर्णयानंतर या समाजाचे जीवन बऱ्याच अंशी सुसह्य होणार आहे.  Success to MLA Jadhav’s Efforts

मच्छीमारांकडे स्वतःची जागा नाही, त्यांची घरे ही गावठाणांमध्ये आहेत. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे. घरांखालच्या जागा नावावर नसल्याने त्यांना कर्ज मिळत नाही, नवीन घर बांधता येत नाही, मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात अशी व्यथा आमदार श्री. भास्करराव जाधव हे गेल्या काही वर्षांपासून विधानसभेत विविध आयुधांच्या माध्यमातून मांडत होते आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होते. मागील सरकारच्या काळात त्यांनी विधानसभेत कोकणच्या विकासाबाबत स्वतंत्रपणे प्रस्ताव मांडून चर्चा घडवून आणली होती. त्यामध्येदेखील मच्छिमार समाजाचा हा प्रश्न त्यांनी जोरदारपणे लावून धरला होता. तद्नंतर तत्कालीन मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्याकडे अनेकदा या प्रश्नावर बैठका झाल्या, पण कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. Success to MLA Jadhav’s Efforts

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले. या आणि मच्छिमार समाजाच्या इतर प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार यांना केली होती. त्यानुसार त्यांनी दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. मा. मुख्यमंत्री यांचे सल्लागार श्री. आशीषकुमार सिंग यांच्यासह मत्स्य, महसूल, ग्रामविकास, वित्त व नियोजन अशा संबंधित सर्व विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव आदी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जागा नावावर करून देण्याबाबत सर्वांमध्ये बराच वेळ खल झाला. Success to MLA Jadhav’s Efforts

गावठाणं जमाबंदी करण्याच्या ग्रामविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार मोजणी करून जमाबंदी करून मिळकत पत्रिका तयार करायच्या. तसे झाले तर आपोआप जमिनी नावावर होवू शकतील किंवा मच्छीमारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे नाव गाव नमून नं. ८ वर असले तरी त्यांना आपण मिळकत पत्र म्हणजेच प्राॅपर्टी कार्ड बनवून देता येईल, असे मार्ग अधिकाऱ्यांनी सुचवले. त्याची कार्यवाही करण्याचे आदेश ना. पवार यांनी दिले होते. त्यावर आ. जाधव यांचे समाधान झाले नाही. ही कार्यवाही वेगाने होण्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमावा, अशी मागणी त्यांनी ना. पवार यांच्याकडे केली. तीही त्यांनी तात्काळ मान्य करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचे आदेश तात्काळ काढले होते. Success to MLA Jadhav’s Efforts

या बैठकीनंतर खऱ्या अर्थाने या विषयाला चालना मिळाली. ना. अजितदादा पवार यांनी दिलेल्या आदेशाची कार्यवाही सुरु झाली. याबाबत नुकतेच महसूलमंत्री ना. श्री. बाळासाहेब थोरात यांनी आमदार श्री. जाधव यांना पत्र पाठवले असून त्यात मच्छिमारांच्या घरांखालील जमिनी त्यांच्या नावावर होण्याबाबत निश्चिती मिळाली आहे. गावठाण परीसिमेतील घरांचे महास्वमित्व अभियान अंतर्गत ड्रोन सर्व्हेद्वारे भूमापन सध्या सुरु आहे. एप्रिल २२ पर्यंत भूमापन करून जागेचे वाटप मच्छिमारांना केले जाणार आहे. भूमापानानंतर संबंधित घरमालकास घराची मिळकत पत्रिका (प्रोपर्टी कार्ड) मिळणार असून त्याच्या आधारे त्यास उद्योगधंदा, घर बांधणी, दुरुस्ती, मुलांचे शिक्षण तसेच अन्य कारणांसाठी कर्ज घेणे शक्य होईल, असे या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. Success to MLA Jadhav’s Efforts

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSuccess to MLA Jadhav's Effortsटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.