गुहागर, ता. 30 : रत्नागिरी थिबा पॅलेस ते चवे देऊड येथील कातळशिल्पे या ४२ किलोमीटरच्या सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यास्पर्धेमध्ये ७० सायकलपटू व 9 महिला सायकलपटू सहभागी झाले होते. चिपळुणच्या प्रसाद आलेकर यांनी १ तास ३२ मिनिटांत अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. महिलांमध्ये दापोलीच्या मृणाल खानविलकर यांनी हे अंतर दोन तास २४ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

पर्यटन संचालनायलय (कोकण विभाग), पुरातत्व विभाग आणि निसर्गयात्री संस्था आयोजित पहिल्या कातळशिल्प पर्यटन महोत्सवांतर्गत सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे रत्नागिरी सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. यास्पर्धेचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले व स्वतः सायक्लोथॉनमध्ये सहभागी होऊन सायकलप्रेमींचा उत्साह वाढवला. गतवर्षीच्या सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित हेदवी ते गणपतीपुळे या सायक्लोथॉनच्या विजेत्या आलेकर बंधूनी रत्नागिरी सायक्लोथॉन मधील आपले वर्चस्व कायम राखले. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

सायक्लोथॉनमध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि गोव्यातील ७० सायकलपटू सहभागी झाले होते. दहा वर्षांपासून ते ६१ वर्षांपर्यंतचे सर्व वयोगटातील सायकलपटू होते. शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर, वकील, शिक्षक, आयटी प्रोफेशनल, सीए, गृहिणी असे सर्व क्षेत्रातील सायकलप्रेमी या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सर्वसमावेशक झाली. देऊड गावातील कातळशिल्प पाहण्यासाठी सायकलवरून येणाऱ्या या स्पर्धकांना पाहून ग्रामस्थांचा देखील उत्साह वाढला. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

या स्पर्धेत १ तास ३२ मिनिटे आणि काही सेकंदाच्या फरकाने महाडचे सुहेल मुकादम दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर चिपळुणच्याच विक्रांत आलेकर यांनी १ तास ३६ मिनिटात पूर्ण करून तिसरा क्रमांक पटकावला. काही सेकंदाच्या फरकाने सिंधुदुर्गातील अभिषेक फाले चौथ्या क्रमांकावर राहिले. नऊ महिला सायकलपटू सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. दापोलीच्या मृणाल खानविलकर यांनी हे अंतर 2 तास २४ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon प्रथम क्रमांक विजेत्यांस रू. ५०००/-, द्वितीय क्रमांक विजेत्यांस रू. ३०००/-, आणि तृतीय क्रमांक विजेत्यांस रू २०००/-रोख रक्कम, पदक व सन्मानचिन्ह देण्यात आले. सर्व सहभागींना पदक व सन्मानचिन्ह देण्यात आले. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

नेवरे येथील कैरी होम स्टे, गणपतीपुळे येथील हॉटेल अभिषेक, गणपतीपुळे हॉटेल असोसिएशन यांनी हायड्रेशन पॉईंटच्या माध्यमातून सायक्लोथॉनला सहकार्य केले. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाने वैद्यकीय सेवा दिली. चिरेखाण व्यावसायिकांनी सर्व स्पर्धकांची देऊड येथे व्यवस्था केली होती. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon
या बक्षीस समारंभाला निसर्गयात्रीचे संस्थापक सुधीर रिसबूड, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, रत्नागिरी पर्यटन संस्थेचे राजू भाटलेकर, देऊड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीशैल्य पुजारी, आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य, हृषीकेश सरपोतदार, चिरेखाण असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. जाधव, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, देऊडमधील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon

सर्व स्पर्धकांनी सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या नेटक्या आयोजनावर समाधान व्यक्त केले. सलग दोन वर्षे ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करणाऱ्या सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे भविष्यातही असे उपक्रम आयोजित करून रत्नागिरीतील दुर्मिळ स्थाने जगापर्यंत पोहोचवण्याचा मानस फाउंडेशनच्या प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केला. Prasad & Mrunal Winner of Rockart Cyclothon
बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
थिबा पॅलेस ते देऊड कातळचित्र सायक्लोथॉन

