गुहागर, ता. 21 : जागतिक ग्राहक दिनानिमित्त विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण गुहागर तहसीलदार कार्यालयात करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. Glory to the students on Consumer Day


यावेळी वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुहागर हायस्कूलची आर्या मंदार गोयथळे, द्वितीय क्रमांक ओम दिपक देवकर व इशा वीरेंद्र चौगुले यांना विभागून देण्यात आला. तृतीय अनुष्का पंकज देवकर.माध्यमिक गट निबंध स्पर्धा – प्रथम क्रमांक हर्षदा श्याम नारकर, द्वितीय भाग्यश्री चंद्रकांत गुरव, तृतीय विभागून धनश्री रवींद्र कळझुनकर व मुक्ती नितीन गडदे.माध्यमिक गटरांगोळी स्पर्धा – प्रथम क्रमांक समृद्धी सचिन मोहिते, द्वितीय भाग्यश्री गुरव, तृतीय स्नेहा आबा शिंदे, उत्तेजनार्थ जानवी आबा शिंदे यांनी प्राप्त केला. या यशस्वी विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. Glory to the students on Consumer Day
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे, शिक्षक सुधाकर कांबळे, मधुकर गंगावणे, गुहागर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मंदार गोयथळे, तहसीलदार कार्यालय कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते. Glory to the students on Consumer Day

