• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

योगेश मुळ्ये यांना केबीबीएफ ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड

by Mayuresh Patnakar
March 17, 2022
in Bharat
16 0
0
Achievers Award to Yogesh Mulye

योगेश मुळ्ये यांना केबीबीएफ ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड सन्मान

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, दि.17 :  रत्नागिरीतील उद्योजक, कॉम्प्युटर कन्सेप्टसचे सर्वेसर्वा योगेश मुळ्ये यांना कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन (Karhade Brahmin Benovalence Foundation)  (केबीबीएफ) (KBBF) ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड सन्मान पुण्य़ामध्ये सुपुर्द करण्यात आला. केबीबीएफ ग्लोबल मीटिंगमध्ये हा पुरस्कार जनता बँकेचे संचालक सीए सुहास पंडित यांच्या हस्ते व माजी संपादक विजय कुवळेकर, जोशी बिल्डर्सचे कौस्तुभ कळके, तसेच केबीबीएफचे ग्लोबल अध्यक्ष श्री. अमित शहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. Achievers Award to Yogesh Mulye

व्यवसाय उभारणी, त्यासाठी केलेली मेहनत, व्यवसायाचे नियोजन, एकूण उलाढाल, तसेच संस्थेसाठी केलेलं काम, संस्था वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न हे निकष लावून पुरस्कार देण्यात आले. संस्था सुरू झाल्यापासून अशाप्रकारे पहिल्यांदाच पुरस्कार देण्यात आला. २०१३ पासून कार्यरत कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन फाउंडेशन (Karhade Brahmin Benovalence Foundation) ही कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांची संघटना असून तिचे ठाणे, पुणे, डोंबिवली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे पाच विभाग आहेत. कोरोना कालावधीनंतर पहिलीच मीटिंग होती व त्यात महाराष्ट्रमधून दोनशेपेक्षा जास्त कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक एकत्र आले होते. यामधून पाच व्यावसायिकांना अचिव्हर्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले. Achievers Award to Yogesh Mulye

श्री. मुळ्ये यांनी २०१६ मध्ये पितांबरी उद्योग समूहाचे  श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या प्रेरणेने रत्नागिरीत केबीबीएफची सुरवात केली. रत्नागिरी परिसरातील अनेक गावांत मीटिंग घेऊन कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांना संस्थेमध्ये सामील करून घेतले. संस्थेमार्फत नियमित मासिक मीटिंग आणि ग्लोबल मिट मधून अनेक छोट्या व्यवसायिकांना पुढे येण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देतात. Achievers Award to Yogesh Mulye

योगेश मुळ्ये म्हणजे कन्सेप्टस हे समिकरणच बनून गेले आहे. 1999 साली श्री. मुळ्ये यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेल्या २३ वर्षांत व्यवसायाची नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत केली. सुरवातीला भाड्याचे छोटे दुकान, काही वर्षांनंतर नव्या जागेमध्ये व्यवसायाचे स्थलांतर केले. Achievers Award to Yogesh Mulye

2014 मध्ये कोकणातील पहिले आणि महाराष्ट्रातील आठवे डेल एक्सलुसिव्ह स्टोअर सुरू केले. 2017 मध्ये कोकणातील एकमेव एचपी वर्ल्डची सुरवात केली. या दोन्ही स्टोअरला बेस्ट परफॉर्मर स्टोअरचा मान अनेकवेळा प्राप्त झाला आहे. 2021 साली कोकणातील सर्वात मोठी आयटी डीलरशिपच्या स्वरूपात १५०० चौरस फुटाच्या प्रशस्त शोरूम सुरू केले. केबीबीएफच्या मीटिंगमधून संकल्पना घेऊन २०१८ मध्ये ई- मँगोज नावाने कोकण प्रोडक्ट ट्रेडिंगसाठी अॅप सुरू केले.  Achievers Award to Yogesh Mulye

त्यांची एकंदर व्यवसाय वाटचाल आणि संस्थेच्या योगदानाबद्दल त्यांना ‘केबीबीएफ आचिव्हर्स अवार्ड’ देऊन सन्मानित केले. याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. Achievers Award to Yogesh Mulye

Tags: Achievers Award to Yogesh MulyeGuhagarGuhagar NewsKarhade Brahmin Benovalence FoundationLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.