सभागृहात एक तास चर्चा, पर्यायी मार्ग आणि ट्राम केअर सेंटरची मागणी
गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटातील चौपदरी रस्त्याच्या संदर्भात आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी 10 मार्चला लक्षवेधी सुचना मांडली. मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम, परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामामध्ये घडणाऱ्या दुर्घटना, पेढे गावातील ग्रामस्थांची सुरक्षा याकडे आमदार जाधव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधले. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly


मुंबई – गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa highway) चौपदरीकरणावरुन मुंबई उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली होती. संथ गतीने सुरु असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. परशुराम घाटात सुरु असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. दरडीमुळे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेढे गावावर संकट ओढवले आहे. आदी मुद्द्यांकडे गुहागरचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly


या लक्षवेधीवर सभागृहात एक तास चर्चा झाली. त्यामध्ये परशुराम घाट, कशेडी घाट यांचे रुंदीकरण, घाटाला पर्यायी रस्ते, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर बांधणे, अशा मागण्या आमदारांनी केल्या. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मुंबई – गोवा (Mumbai-Goa highway)महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटाचे काम अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत सुरु आहे. पण तरीही या घाटाचे काम मे 2022 पर्यंत पूर्ण होईल. तसेच परशुराम घाट ते आरवलीपर्यंतच्या या 34 किमी लांबीच्या रस्त्याच बांधकाम 31 मे 2023 पर्यंत पूर्ण होईल. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly


केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पहाणी करु द्या
मुंबई – गोवा महामार्गावरील किती टक्के रस्ता पूर्ण झाला त्याची आकडेवारी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहात सादर केली. या आकडेवारीला आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी आक्षेप घेतला. सरकारी अधिकारी मंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यापेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना या महामार्गाच्या कामाची पाहाणी करण्यासाठी आमंत्रित करा अशी आमदार जाधव सूचना केली. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही सूचना मान्य केली. त्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी आपण ही केंद्रीय मंत्री गडकरी यांना निमंत्रीत करु. असे सांगितले. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly
ट्रामा केअर सेंटर उभारा
मुंबई – गोवा (Mumbai-Goa highway)महामार्गावर प्रत्येक 100 ते 200 किमी अंतरावर ट्रामा केअर सेंटर उभारण्याची सुचना शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी केली. ट्रामा केअर सेंटर उभारल्यास अपघातग्रस्तांचे जीव वाचतील असे आमदार सुनील प्रभू म्हणाले. तर ओणी येथे ट्रामा केअर सेंटर बांधावे. अशी मागणी राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Construction Minister Ashok Chavan) यांनी चिपळूणमध्ये ट्रामा सेंटर उभारण्याच्या दृष्टीने आखणी करून त्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाला पाठवून मंजुरी घेण्यात येईल. असे आश्र्वासन सभागृहाला दिले. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly
परशुराम घाटात बोगदा
कशेडी घाटात 17 किमी लांबाची बोगदा होत आहे. परशुराम घाटातील अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन या घाटात बोगदा बांधण्याची सुचना शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी केली. तसेच पीर लोटे ते कळंबस्ते पर्यायी मार्गावर विचार करण्यात आला. घाटाचा रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून पीर लोटे ते कळंबस्ते फाट्यापर्यंतच्या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा देऊन सिमेट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे. अशी माहितीही यावेळी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Construction Minister Ashok Chavan) यांनी दिली. Discussion on Mumbai Goa Highway in Assembly

