गुहागर, दि.11 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर. या महाविद्यालय जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून मनीषा सावंत उपस्थित होत्या. त्यांनी महिला दिनाच्यानिमित्ताने इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. Guhagar World Women’s Day


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधा शिंदे यांनी केले. त्यांनी मुलींना समाजात कसे जगायचे तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन मीनल खानविलकर यांनी केले. Guhagar World Women’s Day


या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी आडेकर, सुधाकर कांबळे, मनीषा सावंत, गायत्री कनगुटकर, ज्योती देवकर, सुचिता ठाकूर, स्वामिनी भोसले, जयश्री बाणे, गीतांजली करंजवकर यांनी सहकार्य केले.


सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. Guhagar World Women’s Day

