Operation Ganga: 15900 Indians Came Back
गुहागर, दि. 07 : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या ‘ऑपरेशन गंगा‘ अंतर्गत 6 मार्चला युक्रेनच्या शेजारी देशांमधून 11 नागरी विमानांनी 2,135 भारतीय मायदेशी परतले. आत्तापर्यंत 15 हजार 900 पेक्षा जास्त भारतीयांना ऑपरेशन गंगा सुरू झाल्यापासून भारतात परत आणण्यात आले आहे. Ukraine Russia War

दि. 22 फेब्रुवारी, 2022 पासून विमानांची 66 विशेष नागरी उड्डाणे करून मायदेशी आणलेल्या भारतीयांची संख्या आता 13,852 झाली आहे. तर भारतीय हवाई दलाने आत्तापर्यंत 10 उड्डाणे केली असून 2,056 प्रवाशांना परत आणले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून या देशांना 26 टन मदत सामग्री- साहित्य देण्यात आले आहे. Ukraine Russia War

दि. मार्च रोजी रात्रीच्या कालावधीत विशेष नागरी उड्डाणापैकी 9 विमाने नवी दिल्ली येथे उतरविण्यात आली. तर 2 विमाने मुंबई येथे आली. बुडापेस्ट येथून 6, बुखारेस्ट येथून 2 आणि झेझोव्ह येथून 2 आणि कोशिचे येथून 1 विमान भारतीयांना घेवून मायदेशी आले. Ukraine Russia War

उद्या आठ मार्चला विशेष नागरी विमाने युक्रेनच्या शेजारी देशांतून आणखी काही भारतीयांना घेवून येतील असे अपेक्षित आहे. यामध्ये बुडापेस्ट (5), सुचोवा (2) आणि बुखारेस्ट (1) येथून 1,500 पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी परत आणतील, अशी अपेक्षा आहे. Ukraine Russia War

