महामंडळचा दावा, 300 हून अधिक फेऱ्या सुटल्या
गुहागर, ता. 27 : वेतनवाढीनंतर एस.टी. कर्मचारी कामावर येऊ लागले आहेत. शुक्रवारी (ता. 26) 11 हजार 549 कर्मचारी कामावर आले. राज्यव्यापी संपाच्या 16 व्या दिवशी एस.टी.च्या 300 हून अधिक फेऱ्या सुटल्या. असा दावा एस.टी. महामंडळाने केला आहे. After the pay hike, S.T. Employees are starting to come to work. On Friday (Thu. 26) 11 thousand 549 employees came to work. On the 16th day of the statewide strike, more than 300 STs were released. Such a claim has done by MSRTC. (Employees came to work)
वेतनवाढीचा ऐतिहासिक निर्णय Historical announcement of Pay Hike झाल्यावर आझाद मैदानावरील आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी केली. परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी कामगारांना कामावर येण्याचे आवाहन केले. मात्र तरीही एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवल्याचे जाहीर केले.
या पार्श्वभुमीवर एस. टी. महामंडळाने शुक्रवारी (ता. 26) 11 हजार 549 कर्मचारी कामावर आले. असे जाहीर केले. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 92 हजार 266 कर्मचारी (S.T. Employees) एस.टी.च्या विविध विभागांमध्ये काम करता. त्यापैकी 11 हजार 549 आज कामावर आले. यामध्ये विविध आगारांमध्ये प्रशासकीय विभागात कार्यरत असणाऱ्या 9426 कर्मचाऱ्यांपैकी 6973 कर्मचारी उपस्थित होते. तर, यांत्रिकी विभागातील 17 हजार 560 पैकी 3549 कर्मचारी कामावर आले. राज्यात 37 हजार 225 चालक आहेत. त्यांच्यापैकी 594 चालक कामावर रुजू झाले. तर 28 हजार 55 वाहकांपैकी 433 वाहक कामावर परतले आहेत. अजुनही 80 हजार 717 कर्मचारी कामावर आलेले नाहीत.
राज्यातील मुंबई विभागातून शुक्रवारी 22 एसटीच्या गाड्या (ST Buses) मार्गस्थ झाल्या. कोकणातील ठाणे विभागातून 10, रायगड 69, रत्नागिरी 20, आणि पालघर विभागातून 28 गाड्या रस्त्यावर धावल्या. भंडारा विभागातून 1, सोलापूर 7, औरंगाबाद 9, अहमदनगर 4, नाशिक 18, धुळे, 4, जळगांव 4, कोल्हापूर 18, सातारा 17 आणि पुणे विभागातून सर्वाधिक 83 एस.टी.च्या गाड्या सुटल्या.
मात्र आझाद मैदानावरील आंदोलनाचे नेतृत्त्व ताब्यात घेतलेले वकील सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनी एस.टी. महामंडळाचा दावा चुकीचा असल्याचे सांगितले आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, महामंडळ खोटे आकडे पसरवून दिशाभूल करत आहे. राज्यातील 250 आगारांमधील एस.टी.कर्मचारी आजही संपात सहभागी आहेत.
संबंधित बातम्या
एस.टी. संपाबाबतची इत्यंभूत बातमी
एस.टी.ची वेतनवाढ