नाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव
गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे. अशी तक्रार नाशिकच्या समिर गद्रे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. फसवणुकीची ही घटना मे 2016 ते ऑगस्ट 2016 दरम्यान घडली आहे. Pankaj Khedekar, Dinesh Kumar Mali and Shamkant Kadam have cheated 14 lakh 97 thousand 50 by claiming flat. Sameer Gadre from Nashik has reported this to Guhagar police. The incident took place between May 2016 and August 2016.
नाशिकमध्ये रहाणारे समिर गद्रे यांनी गुहागर पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, गुहागर शहरातील दुर्गादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत समर्थ रेसिडेन्सी ही इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम 2016 मध्ये ईशाक्रिशा कन्स्ट्रक्शन या बिल्डरद्वारे केले जात होते. समिर गद्रे यांना या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी करायचा होता. ईशाक्रिशा कन्स्ट्रक्शनचे पंकज रजनीकांत खेडेकर (रा. खेर्डी, ता. चिपळूण), दिनेशकुमार हरजीराम माळी आणि शामकांत हरिश्चंद्र कदम यांनी गद्रे यांना दुसऱ्या मजल्यावर 202 या क्रमाकांचा फ्लॅट देण्याचे कबुल केले. फ्लॅट खरेदीपोटी 14 लाख 37 हजार 500 आणि फ्लॅटचे खरेदी खत करण्यासाठी 60 हजार असे एकूण 14 लाख 97 हजार 500 रुपये पंकज खेडेकर यांच्याकडे दिले. प्रत्यक्षात सदरचा फ्लॅट पंकज खेडेकर यांनी शामकांत कदम यांना विकल्याचे सांगून समिर गद्रे यांची फसवणूक केली. हा संपूर्ण व्यवहार मे 2016 ते ऑगस्ट 2016 मध्ये घडला. त्यानंतर अनेक वेळा आश्र्वासने देवून सुध्दा या तिघांनी समिर गद्रे यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच दिलेल्या रक्कमेचा संगनमताने अपहार केला. त्यामुळे अखेर समीर गद्रे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांविरुध्द फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली आहे.
गुहागर पोलीसांनी ही तक्रार नोंदवून घेत पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी, शामकांत कदम यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 418 आणि 34 खाली गुन्हे नोंदविले आहेत. सदर प्रकरणाचा तपास गुहागरचे पोलीस निरिक्षक बी. के. जाधव करीत आहेत.