घटस्थापनेपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 दर्शन
गुहागर, ता. 5 : शहरातील वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर घटस्थापनेपासून (7 ऑक्टोबर) भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत भक्तांना कोरोनाचे सर्व नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. Shri Durgadevi Temple (Varchapat Guhagar) will be open for Darshan to devotees from Ghatsthapana (October 7). Devotees will be able to take darshan daily from 7 am to 12 noon and from 12.30 pm to 6.30 pm following all the rules of the corona.
महाराष्ट्र शासनाने 7 ऑक्टोंबर पासून सर्व प्रार्थना मंदिरे उघडण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे सर्व मंदिर व्यवस्थापन समित्यांना मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासही सांगितले आहे. श्री दुर्गादेवी देवस्थानमध्ये 7 ऑक्टोबर 2021 पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरु होत आहे. या उत्सवाचे नियोजन श्री दुर्गादेवी देवस्थान कमिटीने केले आहे. त्याप्रमाणे मंदिर प्रवेशावेळी मास्क घालणे बंधनकारक आहे. वय वर्ष 65 वरील नागरिकांना व वय वर्ष 10 खालील मुलांना मंदिरांत प्रवेश दिला जाणार नाही. कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. श्री दुर्गादेवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिर सकाळी 7 ते 12 व दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत खुले रहाणार आहे. रांगेत राहूनच दर्शन घ्यायचे आहे. श्री दुर्गादेवीच्या पादुकांवर ओटी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिषेक, पंचामृती पूजा, गोंधळ व इतर सर्व धार्मिक कृत्ये केली जातील. धार्मिक कृत्ये केवळ पुजारी करतील. प्रसाद व अंगारा पोस्टामार्फत पाठविण्यात येईल. वरील नियमांमध्ये बदल करण्याचा किंवा वाढविण्याचा अधिकार पंच मंडळींनी राखून ठेवला आहे.