(भाग 4)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
वैद्यक क्षेत्रात डायबेटीसचे मुख्य प्रकार 4 तर उपप्रकार 8 मानले जातात. म्हणजेच मधुमेह रुग्णांची संख्या 12 प्रकारात मोडते.
डायबेटीसचे प्रकार:
१. टाईप I (Type 1) डायबेटीस –
स्वादुपिंडातील B cells नष्ट होऊन इन्सुलिन बनवण्याचे काम थांबते.
२. टाईप II (Type 2) डायबेटीस –
शरीरात इन्सुलिन कमी बनते किंवा बनवलेल्या इन्सुलीनला योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यालाच Insulin resistance म्हणतात.
३. टाईप III (Type 3) विशिष्ठ प्रकार-
A. B Cell (स्वादुपिंडातील इन्सुलिन स्त्रावणाऱ्या पेशी) तील जनुकीय दोष.
B. इन्सुलिन कार्याचा जनुकीय दोष
C. स्वादुपिंदातील अन्तस्त्रावी ग्रंथीचा दोष:-
Pancreatitis स्वादुपिंडांचे ऑपरेशन, स्वादुपिंडाला गाठ व इतर अनेक त्याचप्रमाणे अंतस्त्रावी ग्रंथींच्या विकारामध्ये डायबेटीस सापडतो.
D. इतर अन्तस्त्रावी ग्रंथीचा दोष –
Acromegaly Cushing Syndrome, Thyroid, Glucagonoma व इतर.
E. अनेक औषधांमुळे रक्तातील साखर वाढू शकते. – thyroid Hormone, steroid , thymine, Beta Androgenic Agonist, nicotine acid, pentamidine सारखी अनेक.
F. इनफेकशन – मध्ये रुबेला, cmv virus सारखी इतर
G. इम्युनमेडीयेटेड डायबेटीस – stiff-person syndrome, anti insulin receptor antibodies
H. काही प्रकारच्या जेनेटिक सिंड्रोममध्ये डायबेटीस सापडत. -Down syndrome, porphyria, killfilter syndrome, Turner’s syndrome
४ . टाईप IV ( TYPE 4) –
गरोदरपणात होणारा डायबेटीस.
अशी अनेक कारणे डायबेटीस साठी पाहिली. तरी याद्वारे आपण एक निष्कर्ष असा काढू शकतो. डायबेटीस संदर्भात जनजागरण वर्षातून एकदा व्हावे. रक्तातील साखर प्रत्येक व्यक्तीची लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत तपासून घ्यावी.
भाग 4…(क्रमशः)
रत्नागिरीमधील अपेक्स हॉस्पीटलमध्ये मधुमेहींसाठी 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज केवळ 50 रुग्ण तपासण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी 8482948439 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे