साहील आरेकर : धोपावे ग्रामविकास मंडळाचे सहकार्य
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील धोपावे येथे स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने 22 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला धोपावे ग्रामविकास मंडळाने सर्वप्रकारचे सहकार्य केले.
स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागरने यावर्षी तालुक्यातील कोविड पालक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये 200 गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या उपक्रमासाठी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था सहकार्य करत आहेत. याच अभियानांतर्गत 22 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम धोपावे येथे गणेशोत्सवात पार पडला.
गणेशोत्सवाची लगबग असतानाही धोपावे येथील कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबईतर्फे करण्यात आले होते. या मंडळाचे कार्यकर्ते अनिल भूवड, लक्ष्मण भेकरे, आशिर्वाद पावसकर, भालचंद्र निमकर यांनी गावातील विद्यार्थ्यांची निवड प्रतिष्ठानच्या निकषांनुसार केली. आरेकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी शाळेची जागा उपलब्ध करुन देणे, तेथील सर्व व्यवस्था पूर्ण करणे आदी कामेही धोपावे ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्तम वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला धोपावेचे सरपंच सदानंद पवार, स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागरचे साहिल आरेकर, धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अनिल चव्हाण, सरचिटणीस अनिल भुवड, खजिनदार प्रकाश डावळ, लक्ष्मण भेकरे, बलवंत पवार, अक्षता भुवड, जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र डावल, मोहन पवार, अनंत डावल, शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर, आशिर्वाद पावसकर, भालचंद्र निमकर उपस्थितीत होते. कार्यक्रम आयोजनामध्ये माता रमाई महिला मंडळ,बौध्दवाडीच्या सदस्या सौ. संध्या पवार ,सौ. रचना जाधव तसेच विकास जाधव आणि मध्यवर्ती समितीचे सदस्य मनोज पवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सेक्रेटरी अनिल भुवड यांनी केले. तर लक्ष्मण भेकरे यांनी सर्वांचे आभार मानले.
Late Sadanand Arekar Pratishthan Guhagar were distributed educational materials to 22 needy students from Dhopave, Tal. Guhagar. The Dhopave Gram Vikas Mandal provided all possible assistance to the foundation’s program for this initiative.
Anil Bhuvad, Laxman Bhekare, Ashirwad Pawaskar, Bhalchandra Nimkar selected the students from Dhopave, according to the criteria of the foundation. Activists of Dhopave Gram Vikas Mandal also provided school space for the Arekar Pratishthan program and completed all the arrangements there. So the whole event passed in a great atmosphere.