तहसीदार वराळेंचे शृंगारतळीतील सभेत आवाहन
गुहागर, ता. 01 : वहातुक कोंडी टाळण्यासाठी मार्गदर्शक सुचना प्रसिध्द करण्यात येतील. त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. उनाट गुरांसंदर्भात कायदेशीर कार्यवाही कशी करता येईल ते पाहू या. कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालक करुन गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे. त्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने आयोजीत केलेल्या शांतता कमिटीच्या सभेत बोलत होत्या.
Guidelines will be published to avoid traffic jams. It should be strictly enforced. Let’s see how legal action can be taken against unattended cattle. Everyone should cooperate to celebrate Ganeshotsav by following all the rules regarding corona. Such an appeal was made by the tehsildar of Guhagar, Mrs. Pratibha Varale has done it for traders. She was speaking at a peace committee meeting organized by Patpanhale Gram Panchayat.
गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभुमीवर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शांतता कमिटीची सभा बोलावली होती. या सभेला तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार उपस्थित होते. गुहागर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीमध्ये गणेशोत्सव काळात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. या विषयी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये उनाड गुरे, वहातुक कोंडी, कोरोना या मुद्द्यांवर चर्चा झाली. व्यापारी, ग्रामस्थांची मते समजून घेवून निर्णय घेण्यात आले.
वहातुक कोंडीवर मात करण्यासाठी तीन ठिकाणे निश्चित करुन तेथे तात्पुरते रिक्षा स्टॅण्ड बनवण्याचे ठरले. तालुक्यातून येणाऱ्या वडापच्या गाड्या बाजारपेठेबाहेर उभ्या रहातील. क्रमांकाप्रमाणे वडाप वहातुकदारांनी केवळ 5 गाड्या बाजारपेठेत उभ्या कराव्यात. खासगी प्रवासी बसेस उभ्या करण्यासाठी बाजारपेठ सोडून स्वतंत्र जागा दिली जाईल. बाजारपेठत दुकानांसमोरील जागेत दुचाकी उभ्या करता येतील. मात्र विनाकारण कोणतेही वाहन शनिवार, 3 सप्टेंबर पासुन बाजारपेठेतील रस्त्यावर उभे रहाणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी. यासंदर्भात पोलीस आणि तहसीलदार एकत्रीतरित्या मार्गदर्शक सुचना जाहीर करतील. त्याची माहिती देण्याचे काम ग्रामपंचायत करेल. व्यापारी आपल्या ग्राहकांपर्यंत हा विषय पोचवतील. असा निर्णय या सभेत घेण्यात आला. ठरलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब न करणाऱ्या वाहनचालकावर थेट कारवाई करण्यात येईल. अशी सूचना यावेळी उपनिरीक्षक दिपक कदम यांनी मांडली. त्यावर गौरव वेल्हाळ यांनी सदर सूचनांची माहिती वडाप, रिक्षा संघटना आणि खासगी प्रवासी बसेस मालक यांना स्वतंत्र बैठकीद्वारे द्याव्यात अशी सूचना केली. वहातुक व्यवस्थेला उनाड गुरांचा त्रासही कारणीभूत ठरतो. त्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे. अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. याबाबतच्या चर्चेनंतर कोणती कायदेशीर कारवाई करता येईल. याची माहिती घेवून गणेशोत्सवापूर्वी निर्णय घेवू. असे तहसीलदार सौ. वराळे यांनी सांगितले.
शृंगारतळी बाजारपेठेतील प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क नसणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत करेल. त्यासाठी पोलीस प्रशासनाने साह्यभूत व्हावे. अशी विनंती सरपंच संजय पवार यांनी केली.
गणेशोत्सवापूर्वी सर्व व्यापाऱ्यांनी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसह आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी. जे दुकानदार टेस्ट करणार नाहीत. त्यांना दुकाने उघडता येणार नाही. असा आदेशच तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी दिला. लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणी या दोन्ही गोष्टी वेगवगेळ्या आहेत. कोरोना तपासणीचा उद्देश मी सुरक्षित आहे. माझ्यापासून दुसऱ्याला कोरोना होणार नाही. यासाठी आहे. तर लसीकरणाचा फायदा स्वत:ला कोरोना झाला तरी रुग्णालयापर्यंत पोचावे लागणार नाही यासाठी आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
या बैठकीला नासीम मालाणी, गौरव वेल्हाळ, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजीत बेलवलकर, विशाल बेलवलकर पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर चव्हाण, अंगणवाडी सेविका सारिका हळदणकर आदी उपस्थित होते.