नदिम मालाणी, ३ रा वर्धापन दिनानिमित्त मार्टला भेट द्या
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील सर्वांत मोठे किराणा मालाचे आणि सर्वात कमी दर असलेले दुकान म्हणून ओळख असलेल्या मालाणी मार्टचा ३ रा वर्धापन दिन शनिवार, 28 ऑगस्टला संपन्न होत आहे. या निमित्ताने मालाणी मार्ट 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत सवलत महोत्सव साजरा करत आहे. यामध्ये मालाणी मार्टमधील विविध वस्तुंवर 5 टक्के ते 50 टक्के इतकी मोठी सवलत देण्यात येणार आहे. आमच्या असंख्य ग्राहकांनी गेल्या तीन वर्षात आम्हाला दिलेल्या प्रेमाचे, आपुलकीचे प्रतिक म्हणून वेगळ्या पध्दतीने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सवलत महोत्सव आयोजीत केल्याचे नदीम मालाणी यांनी सांगितले आहे.
Malani Mart is the largest grocery store in Guhagar taluka. It is also known as lowest priced shop. Malani Mart is celebrating its 3rd anniversary on Saturday, August 28. On this occasion, Malani Mart is celebrating the Discount festival from 28th August to 10th September. This will include a huge discount of 5 per cent to 50 per cent on various items at Malani Mart.
शृंगारतळीतील मालाणी मार्ट म्हणजे खरेदीची लयलूट करण्याची संधी. येथे अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल अशा जिन्नसांपासून ते बिस्कीटे, साबण, अगरबत्ती अशा नित्य गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी कायम उपलब्ध असतात. सामान्य उत्पादनांपासून ब्रॅण्डेड उत्पादने एकाच ठिकाणी खरेदी करतात येतात. विशेष म्हणजे 365 दिवस कोणत्या कोणत्या वस्तू छापील किंमतीपेक्षा कमी दरात उपलब्ध असतात. त्यामुळे शृंगारतळीबरोबरच गुहागर तालुक्यातील विविध गावांतील मंडळी या दुकानात खरेदीसाठी येतात.
Nadeem Malani owner of Malani Mart said that this Discount festival was organized to express our gratitude to him in a different way as a symbol of love and affection given to us by many of our customers in the last three years.
तीन वर्षांपूर्वी 28 ऑगस्ट 2018 रोजी मालाणी मार्ट या भव्य किराणा आणि गृहोपयोगी साहित्य दालनाचा शुभारंभ नासिमशेठ मालाणी आणि त्यांचे सुपुत्र नदीम मालाणी यांनी केला. अल्पावधीतच मालाणी मार्टची ख्याती गुहागर तालुक्यासह चिपळूणपर्यंतच्या गावांमध्ये पोचली. कोरोना काळातही लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी शासनाचे सर्व नियम पाळून मालाणी मार्ट ग्राहक सेवा देत होते. आज मालाणी मार्ट तिसरा वर्धापन दिन साजरा करत आहेत. या निमित्ताने मालाणी परिवाराने सर्व ग्राहकांना मालाणी मार्टमध्ये आमंत्रीत केले आहे. तीन वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोना संकट येवूनही ग्राहकांनी दाखवलेल्या विश्र्वास आणि आपुलकीमुळेच हा यशस्वी प्रवास घडु शकला. असे विनम्रपणे नदीम मालाणी यांनी सांगितले आहे.