गुहागर, ता. 22 : वेळणेश्र्वरमध्ये ग्रामविकास प्रकल्प उभ्या करणाऱ्या साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडे 51 हजार रुपयांची देणगी सुपूर्त केली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देश्याने ही मदत केल्याचे शरद जोशी यांनी सांगितले.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर येथे विवेकानंदालय हा वेगळ्या धाटणीचा वृद्धाश्रम साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट उभा करत आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकासाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून बचतगटांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, वृक्ष लागवड, जंगल जतन अशी वेगवेगळी कामे या ट्रस्टद्वारे केली जातात.
चिपळूणला आलेल्या पुरामुळे जनजीवन उध्वस्थ झाले. अशा परिस्थितीत तेथील जनतेला आधार देणे. हे कर्तव्य समजून साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिल स्विकारत 51 हजार रुपये रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कार्यवाह मंदार लेले यांच्याकडे सुपूर्त केले आहेत.