• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नवजात अर्भकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

by Mayuresh Patnakar
August 18, 2021
in Old News
16 0
0
चिखलीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यु
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तपासात प्रगती नाही, पोलीसांचे माहिती देण्याचे आवाहन

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटीजवळ 14 ऑगस्टला सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला आहे. 16 ऑगस्टला प्रकृती चिंताजनक असल्याने जिल्हा रुग्णालयातून अधिक उपचाराकरीता या बालिकेला अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान नवजात अर्भकाच्या मातेचा आणि पालकांचा शोध अद्यापही सुरुच आहे. जो कोणी या घटनेसंदर्भात माहिती देईल त्याचे नांव गुप्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जागरुक नागरिकांनी पुढे येवून माहिती द्यावी. असे आवाहन गुहागर पोलीसांनी केले आहे. (The newborn girl, who was found on August 14, died today, August 18, during treatment.)
14 ऑगस्टला तरीबंदर फेरीबोट तिकिट गृहामागील खाजणात रात्री 9 च्या दरम्यान स्त्री जातीचे नवजात अर्भक ( Newborn Female Baby) सापडले होते. त्याला उपचारासाठी जिल्हा रग्णालयात (Civil Hospital) ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर बाळ 9 महिने 9 दिवस पूर्ण होण्या आधीच जन्माला आल्याचे लक्षात आले. (Immature Birth) सदर बाळाच्या डोक्याला लागले होते. म्हणून जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन आदी तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी सदर बाळाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे तसेच फुफ्फुसे, मेंदू, मणका आदी अवयवांचा होणार विकास झाला नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे सदर बाळाला अधिक सोयी सुविधा असलेल्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घेतला. 16 ऑगस्टला सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून अन्य रुग्णालयात नवजात बालिकेला हलविण्यात आले. मात्र 18 तारखेला पहाटे सदर बाळाचा मृत्यू झाला आहे. (On 18th August the baby passed away during treatment)


दरम्यान सदर बाळाला टाकून देणाऱ्या अज्ञान व्यक्तींच्या तपासाला अजुनही वेग आलेला नाही. विविध मार्गांनी चौकशीचे काम पोलीस करत आहेत. सदर अज्ञात व्यक्तींची माहिती असणाऱ्या लोकांनी पुढे येवून माहिती सांगावी. त्यांचे नाव गूप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन पोलीसांनी केले आहे. आरोग्य सेवक सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अन्य शासकीय, निमशासकीय, विविध मंडळाद्वारे समाजात काम करणारी युवा पिढी, आदी सर्वांनी या घटनेसंदर्भात मिळणारी कोणतीही माहिती  त्वरीत पोलीसांना सांगावी. असे आवाहन घटनेचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम यांनी केले आहे.

Tags: Breaking NewsDeathDistrict Civil HospitalGuhagarGuhagar NewsImmature BirthLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNewborn BabyNews in GuhagarNews in Marathitreatmentटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.