रत्नागिरी- राष्ट्रीय प्रोॲक्टिव्ह अबॅकस ऑनलाइन स्पर्धेत येथील एज्युकेयर फाउंडेशनच्या एज्युकेअर प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या सात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत भारतासोबत ८ देशातून विद्यार्थी व भारतातील एकूण १६ राज्यातील ४ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे स्वरूप विविध गटात ६ मिनिटामध्ये १०० अचूक गणिते अबॅकस व विदाऊट अबॅकस सोडविणे असे असते.
लिटिल चॅंप गटात एज्युकेयरच्या दुर्वा चव्हाण (इ. दुसरी) हिने ४.३६ मिनिटात पैकीच्या पैकी १०० गणिते अचूक सोडवून राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला.
अनुप केतकर (इ. पहिली) याने ६ मिनिटात ८८ पैकी ६८ अचूक गणिते सोडवत उत्तेजनार्थ चौथा क्रमांक मिळविला.
मोठ्या मुलांच्या लेव्हल २ गटात माही सावंत (इ. सहावी) हिने ४.५५ मिनिटात १०० पैकी ९२ गणिते विदाऊट अबॅकस सोडवत तृतीय क्रमांक मिळविला.
श्रेयस शिंदे (इ. सहावी), समर्थ दुड्ये (इ. चौथी), जान्हवी गुरव (इ. चौथी), विधी पोकळे, (सीनियर केजी, मुंबई) आदींनी विविध गटात विशेष प्रावीण्यासह उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.
या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना एज्युकेयर प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या संचालक सोनल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. प्रोअॅक्टिव्ह अबॅकस कंपनीचे संचालक अध्यक्ष गिरीश करडे, संचालक अजय मणियार, एज्युकेयर फाउंडेशनचे संचालक स्वप्नील सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.