• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओझर नदीतील गाळ काढण्याचा कामात भ्रष्टाचार

by Mayuresh Patnakar
August 10, 2021
in Old News
16 0
0
ओझर नदीतील गाळ काढण्याचा कामात भ्रष्टाचार
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पवारसाखरीतील अक्षय पवार यांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा अर्ज

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील पवारसाखरीमधील ओझर नदीतील गाळ काढणे आणि संरक्षक बांध घालण्याचे काम ( Dredging of river and construction of protective Wall) एप्रिल महिन्यात झाले. या कामात भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा आरोप अक्षय पवार यांनी केला होता. जूनपासून केलेल्या पत्रव्यवहारांना शासनाकडून उत्तर न मिळाल्याने अक्षय पवार यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणाला बसणार (Akshay Pawar will go on a fast on Independence Day) असल्याचे पत्र शासनाला दिले आहे.  
साखरी बुद्रुक/खुर्द ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ओझर नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामाला 14 व्या वित्त आयोगातून 4 लाख 59 हजार 673 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हे काम घाणेखुंट, ता. खेड सद्‌गुरु समर्थ मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. याच कामात हरिश्र्चंद्र पवार ते वडाचा पायथा मोरी असा 200 मिटरची संरक्षक भिंत बांधण्याचा समावेश होता. सदर काम मक्तेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याने भिंत दोन वेळा कोसळली आहे.
या कामाला अक्षय पवार यांनी 1 जून रोजी आक्षेप घेतला होता. 14 व्या वित्त आयोगातील निधीचा ग्रामसभेचा ठराव लागतो. तसा ठराव न करता सदर निधी वापरण्यात आला आहे. सदर कामाचे मुल्यांकन करताना पंचायत समितीच्या अभियंत्यांनी 3 पट अधिक मुल्यांकन केले आहे. इतके अधिक पैसे ठेकदाराला देवूनही काम निकृष्ट दर्जाचे केल्याने पावसापूर्वीच बंधारा कोसळला. याबाबत आक्षेप न घेता ग्रामसवेकांनी हे काम पुन्हा करुन घेतले. मात्र तरीही पुन्हा बंधारा कोसळला. त्यामुळे स्वतंत्र एजन्सीतर्फे कामाचे अंदाजपत्रक तयार करावे, अधिक मुल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. ठेकेदाराने केलेल्या कामाचे मुल्यांकन करावे. त्याला देण्यात आलेले अधिकच्या पैशांची वसुली व्हावी. अशी मागणी अक्षय पवार यांनी केली होती. मात्र या पत्रावर शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे 20 जुलैला अक्षय पवार यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत साखरी खु./बु आणि पोलीस ठाणे यांना पत्र लिहून स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे कळविले आहे.
Allegations of Akshay Pawar :
Poor Quality Work, Corruption, Government Officers make estimate with over valuation, Not taken Resolution of Gramsabha Before Work Order, Gramsevika Also participated in this work, Within two months Two Times the New Protection wall slides.

Tags: Breaking NewscorruptionestimateGovernment OfficersGramsabhaGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiover valuationPoor Quality WorkProtection wallResolutionWork Orderटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.