गुहागर, ता. 06 : शहरातील सौ. पारिजात कांबळे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सौ. रसिका रमेश आंबोकर यांनी गुहागरमध्ये येवून दिले. सौ. पारिजात कांबळे या शिवसेनेच्या गुहागर तालुका महिला आघाडी प्रमुख आहेत.
Mrs. Parijat Kamble has been selected as the taluka president of the Women’s Security Association. Ratnagiri District President Mrs. Rasika Ramesh Ambokar gives the appointment letter to Mrs. Parijat Kamble. Mrs. Parijat Kamble is the head of Shiv Sena’s Guhagar taluka women’s front.
महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य ही शासनमान्य, नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेतर्फ महिलांवरील अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, कौटुंबिक हिंसाचार, आदी विषयात लक्ष घालून महिलांना न्याय मिळण्यासाठी मदत केली जाते. सौ. पारिजात कांबळे गेली 8 वर्ष गुहागर तालुक्यातील महिलांना आधार देण्याचे काम करत आहेत. अनेक निराधार महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिला. बँकेमधुन उद्योगासाठी कर्ज उभे करुन दिले. सध्या शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत महिला सुरक्षा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष किसनराव काशिद पाटील यांनी सौ. पारिजात कांबळे यांची गुहागर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल कोकण अध्यक्ष सौ. दिपिका दिपक देवळेकर यांनी सौ. कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.