• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शरद पवारांनी केले खातू मसालेंचे कौतूक

by Mayuresh Patnakar
July 22, 2021
in Old News
16 0
0
शरद पवारांनी केले खातू मसालेंचे कौतूक
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : गुहागरमधील खातू मसाले उद्योगचे मसाले कोकणी खाद्य पदार्थांच्या चवीत अधिक भर टाकतील. असे मत माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. खातू मसाले उद्योगला पत्र लिहून शरद पवारांनी या खातू परिवाराचे कौतुक केले आहे.
The spices of the Khatu Masale Udyog in Guhagar will add more to the taste of Konkani food. This view has been expressed by former Union Minister, President of NCP, Rajya Sabha MP Sharad Pawar. In a letter to Khatu Masale Udyog, Sharad Pawar has praised the Khatu family.
चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि शरद पवार कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहेत. आमदार निकमांचे सुपुत्र श्री. अनिऋद्ध निकम शरद पवार यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी खातू मसाले उद्योगचे मसाले शरद पवार यांच्या घरी भेट म्हणून दिले. ही भेट पवार कुटुंबाला इतकी आवडली की, देशातील विविध प्रश्र्नांचा अभ्यास करणारे, त्यावर मार्गदर्शन करणारे, राजकारणात व्यस्त असणारे शरद पवार यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खातू मसाले उद्योगला एक स्वतंत्र पत्र लिहिले.
या पत्रात शरद पवार म्हणतात, “कोकणी खाद्यपदार्थ चवीकरता जगभरात प्रसिद्ध आहेत. खातू मसाले उद्योगातील विविध प्रकारे मसाले कोकणी खाद्य पदार्थांच्या स्वादात अधिक भर टाकतील. आपल्या व्यवसायासाठी  माझ्या शुभेच्छा.”
विशेष म्हणजे खातू मसाले उद्योगचा गुहागरचा पत्ताही शरद पवारांच्या स्वीय सहाय्यकांना माहिती नव्हता. त्यांना हा पत्ता शोधताना मुंबईतील कार्पोरेट ऑफीसचा पत्ता मिळाला. या पत्त्यावर हे पत्र पोस्टाने पाठविण्यात आले. त्यामुळे या पत्राचे महत्त्व आणखी गडद होते.
या पत्राबद्दल बोलताना खातू उद्योगचे शाळीग्राम तथा बंधु खातू म्हणाले की, आमची व्यक्तिश: ओळख नसली तरी आमदार निकम यांच्यामुळे पवार कुटुंबियांच्या घरी गेली अनेक वर्ष खातू मसाले उद्योगचे मसाले जात आहेत. खासदार सुप्रियाताई सुळे या देखील आवर्जुन आमचे मसाले वापरतात. आज थेट शरद पवारांसारख्या नेत्याने पत्र पाठवून आमच्या उत्पादनांचे कौतुक केले. आमची उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याची पोचपावतीच त्यांनी पत्रामुळे आम्हाला मिळाली आहे. ही गोष्ट आमच्यासाठी लाखमोलाची आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsGuhagar TasteKhatu Masale UdyogKonkani food. Former Union MinisterLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiPresident of NCPRajya Sabha MPSharad PawarThe spicesटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.