गुहागर, ता. 18 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसंपर्क अभियानाची सुरुवात १२ जुलै पासून राज्यभर करण्यात आली. आज रविवार दि. 18 रोजी गुहागर तालुक्यातील पडवे जि. प. गटामध्ये गुहागरचे लोकप्रिय आमदार भास्कर जाधव, रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरवात करण्यात आली.
गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातील तवसाळ पंचायत समिती गण व खोडदे गणामध्ये शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ तालूकाप्रमुख सचिन बाईत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. शिवसंपर्क अभियाना मार्फत लोकांशी संपर्क करुन शिवसेनेचे काम व धोरण जनतेपर्यंत पोचविण्यात येणार आहे. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक यासाठी शिवसैनिक काम करणार आहेत.
शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, पं. स. सदस्य रविंद्र आंबेकर , जेष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, विभागप्रमुख नरेश निमुणकर, विलास गुरव, शरद साळवी, उकार्डे, काशिनाथ मोहिते, बाबा वैद्य , उपविभाग प्रमुख रवींद्र गावडे, संदीप निमुणकर, महिला आघाडीच्या वनिता डिंगणकर, सौ. रायकर, सर्व शाखा प्रमुख, यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.