• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत बाजारपुल उद्यापासून वहातुकीस बंद

by Manoj Bavdhankar
July 13, 2021
in Old News
21 0
0
पालशेत बाजारपुल उद्यापासून वहातुकीस बंद
41
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सार्वजनिक बांधकाम;  15 गावांचा संपर्क तुटणार

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पालशेत बाजारपुलाच्या एका खांबावर दगड आपटून पुल कमकुवत झाला आहे. त्यामुळे  गुरुवार 14 जुलैपासून वहातुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने घेतला आहे. परिणामी अडूर, वेळणेश्र्वर, हेदवी आदी 15 गावांशी एस.टी. आणि अवजड वाहने जाऊ शकणार नाहीत.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता कु. सलोनी निकम यांनी बुधवारी 13 जुलैला तहसीलदार, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, सरपंच पालशेत ग्रामपंचायत, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकाऱ्यांना पुलावरील वहातूक बंद ठेवण्याबाबत कळवले आहे. या पत्रात पालशेत बाजारपेठेतील पुलाचे तीन खांब कमकुवत झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
याबाबत अभियंता निजसुरे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, गेले दोन दिवस नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लाकडे, दगड या पुलावर आदळले आहेत. त्यामुळे पुलाच्या खांबांचे पुर्वेकडील दगडांनी जागा सोडली आहे. जुने बांधकाम चुना, गुळ आणि माती वापरुन केलेले आहे. सतत पुराचे पाणी वेगाने आत जावून पुलाच्या खांबांचे दगड पडू शकतात. पावसाळ्यात अवजड वहातूकीमुळे पुल पडू शकतो. अपघात होव शकतो. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हा पुल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर पुल बंद झाल्यावर अडूर, वेळणेश्र्वर, हेदवी, नरवण आदी 15 गावांचा गुहागरशी संपर्क तुटणार आहे. दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांना बारबाई, गोवर्धन बाग मार्गे मारुती मंदिर हा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. मात्र हे वाडी रस्ते असल्याने अरुंद आहेत. एस, ट्रक आदी वाहनांसाठी हे रस्ते अडचणीचे ठरणार आहेत.

गुहागरकरांमागे पुलांचे शुक्लकाष्ठ

2019 मध्ये मोडकाआगरचा पुल वहातुकीस धोकादायक म्हणून बंद करण्यात आला. त्यामुळे गुहागर शहरासह पालशेत, असगोली आदी गावांमधील लोकांना 22 कि.मि.चा फटका बसला. आता 2021 च्या पावसाळ्यात पालशेत पुल बंद झाल्याने पुन्हा एकदा 15 गावांना गुहागरला येणे अडचणीचे ठरणार आहे. वहातुकीमधील अडथळ्यांचा परिणाम व्यापारासह पर्यटन उद्योगावरही होणार आहे.

Tags: Breaking NewsclosedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMarket BridgeNews in GuhagarNews in MarathiPalshetTrafficटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share16SendTweet10
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.