• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरेगावातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

A young man from Aregaon drowned

by Mayuresh Patnakar
July 11, 2021
in Old News
16 0
0
Drown in River
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार केतन रविवारी, ता. 11 जुलैला दुपारी 1.30 च्या दरम्यान अंजनवेल परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. या दुर्दैवी घटनेमुळे आरेगांववर शोककळा पसरली आहे. केतनच्या पश्चात भाऊ, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
अंजनवेल गावात कातळवाडी ते पेठ अंजनवेल असा अंतर्गत रस्त्या आहे. या रस्त्याच्या बाजुने वाहणाऱ्या नदीवर अनेक ठिकाणी पक्के बंधारे बांधण्यात आले आहेत.  पावसाळ्यात गुहागर तालुक्यातील कॉलेज विद्यार्थी, पुरुष, महिला येथे पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. आज रविवार असल्याने या रस्त्यावरील अनेक बंधाऱ्यांवर पोहोण्यासाठी गर्दी झाली होती. केतन भोसलेही आपल्या मित्रांसोबत  या नदीवरील एका बंधाऱ्यावर 11 जुलैला दुपारी 1.30 च्या दरम्यान पोहायला गेला होता. पोहताना अचानक केतन दिसेनासा झाला. केतनच्या मित्रांनी बाजारपेठत पुलापर्यंत केतनचा शोध घेतला. त्यानंतर आरेगावातील ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्यास सुरवात केली. सायंकाळी 6.00 च्या दरम्यान केतनचा मृतदेह याच नदीत सापडला. पस्तीशीच्या दरम्यान वय असलेल्या केतनच्या या अपघाती मृत्यूमुळे आरेगावात शोककळा पसरली आहे.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.